कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी व्हा!

कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी व्हा!
1921 क्रमांकावर मिस्ड कॉल करा
आरोग्याच्या सुरक्षितेसाठी; आरोग्य सेतू ॲप
चंद्रपूर,दि.11 जून: कोविड संदर्भात दूरध्वनी सर्वेक्षण मध्ये सहभागी होण्यासाठी 1921 टोल फ्रि सेवा सुरु केली आहे.वापरकर्ता 1921 या क्रमांकावर मिस्ड कॉल देईल.कॉल डिस्कनेक्ट होईल आणि नागरिकांना कॉल बॅक मिळेल. विचारले जाणारे प्रश्न व स्वतःचे मूल्यांकन आरोग्यसेतु याप्रमाणेच आहे. दिलेल्या प्रतिसादाचा आधारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना मिळतील. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त या टोल फ्रि क्रमांक 1921 तसेच आरोग्याविषयक माहितीसाठी 1075 क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता केंद्र व राज्य शासन विविध उपाय योजना राबवित आहे.सर्वात महत्वाची उपायोजना म्हणजे देशभरात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. कोरोनाशी संबंधित माहिती, आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषाणूची जोखीम कितपत आहे यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप लॉन्च केले आहे.जिल्ह्यात 1 लाख 82 हजार 586 नागरीकांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करीत आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करावे, हे अॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असून त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी आणि सर्वांनी याबाबत सजग राहून त्याविरोधात लढा उभारावा, यासाठी हे अॅप मार्गदर्शन करेल. सर्व भारतीय भाषांमध्ये सदर अॅप उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वांना समजेल अशी माहिती त्यावर आहे. आरोग्य सेतू अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं. जीपीआरद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येतं. तसेच कोणताही कोरोनाग्रस्त