सावलीच्या लक्ष्य डोंगरे यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे निवड

सावली येथील लक्ष्य पृथ्वीराज डोंगरे या विद्यार्थ्यांची पहिल्या टप्प्यात एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जे. जे. हॉस्पिटल मुंबई येथे निवड झाली आहे. लक्ष डोंगरे म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी जीवाचे रान करून माझ्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. लक्ष्यचे वडील गुरुदेव हायस्कूल जिबगाव येथे सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात. लक्षला निट परीक्षेत 720 पैकी 571 गुण आहेत सावली सारख्या ग्रामीण भागात राहून त्याने यश प्राप्त केले आहे. त्यामुळे त्याचे श्रेय आई वडील यांना देत असून ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा खूप अभ्यास करून समोर जाऊ शकतो असे लक्षने सिध्द केले आहे. तसेच वेळोवेळी मला माझ्या गुरुजणांचे मार्गदर्शन लाभले असे लक्ष म्हणाला.