Vidarbh24News

Latest Online Breaking News

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

सावली : तालुक्यातील शेत जमीन परिसरालगत आपली स्वताची जनावरे राखन करीत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, खुशाल कवडू शेट्टे (वय 50) वर्ष असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. तो उपरी येथील रहिवाशी असुन उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल असल्याने या परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीनी जंगल परिसरात असल्याने सोबतच या भागात मोठ्या प्रमाणात वाघाचा धामाकुळ असून वाघाची नेहमीची दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या दिवशी शेतकरी खुशाल शेट्टे आपली जनावरे गाई; मशी चराईसाठी जंगल परिसरातील कक्ष क्र.198 लगत चराई करीत असताना या भागात दब्बा धरून बसलेल्या वाघाने मशी वर हल्ला केला.
मशीने इतरत्र धाव घेतली परिणामी गाई म्हशी राखणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने झडप घेतली. जखमी शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला व लगतच सदर परिसरात काही महिला पुरुष सर्पनाकरिता गेले असता जखमी शेतकऱ्याची ओरड पाहून त्या ठिकाणी धाव घेत

 लगेचच जखमी शेतकऱ्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले. सदर जखमी शेतकऱ्याला शरीरावरती अनेक जखमा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भागात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असून भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या तर धान पिकाचा हंगाम हाती येत असताना सर्वत्र शेतकरी आपल्या शेतावर असतात त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे या भागातील वन्यजीवांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत उपक्षेत्र अंतर्गत उपरी येथील वनरक्षक यांनी जखमी शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!