गडचिरोली जील्ह्यातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी,
गडचिरोली जील्ह्यातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी,
पुढील 72 तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा जनतेला प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन..
विदर्भ 24 न्यूज..
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात लगत ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने आज 11जून रोजी सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली.यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.तर आज गडचिरोली जील्ह्यात पावसाने झोडपून काढले. प्रशासनाकडून पुढील 72 तासांत जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या काळात शेतात काम करताना तसेच बाहेर असताना योग्य ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे . वज्राघातापासून बचावासाठी झाडाखाली उभे राहू नये तसेच धातुसदृश्य वस्तू जवळ बाळगू नये,असे आवाहन करण्यात आले आहे .



