पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या गावानुसार प्रसिद्ध
E-kyc केल्यानंतर दोन दिवसात 50,000/- रूपये खात्यात जमा होणार
शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी असून पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या या जिल्ह्यानुसार गावानुसार तालुक्यानुसार आज दिनांक रोजी जाहीर झालेले आहेत. पन्नास हजार रुपये पर्सन अनुदानाच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.
शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारा रोशन आणि प्रतीक्षा पाहता 11 ऑक्टोबर 2022 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी याद्या प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
आज याद्या प्रकाशित करून पुढील केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात सुरुवात झाली आहे. ही केवायसी प्रक्रिया 12 ऑक्टोबरच्या 17 ऑक्टोबर दरम्यान पूर्ण करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.
आता याद्या पाहण्यासाठी तुम्हाला नजीकच्या शेतकरी सहकारी सोसयटी, गावची चावळी किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन व याद्या पाहायला मिळणार आहेत. सदरच्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड वरून तुम्हाला त्याची केवायसी करावी लागणार आहे.
दरवर्षी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देणे साठी शासन निर्णय उद्धव ठाकरे यांच्या कालावधीमध्ये घेण्यात आला होता परंतु सदर चे प्रोत्साहन अनुदान पर्यंत मिळालेले नव्हते. सदरचे प्रोत्साहन अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने जोर लावला होता.
यावर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचा पिकाचे वातावरणात नुकसान झालेले असून पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदान यादी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांनी आपली केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे सदरची केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्ड घेऊन नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी त्यांची केवायसी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.
केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करावी.
केवायसी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त दोन दिवसांमध्ये पन्नास हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ज्यांचे यादीमध्ये नाव आले नाहीत त्यांनी आपल्या नजीकच्या बँकेमध्ये संपर्क करावा.