ग्रापं कार्यालय व जिप शाळा कवठी येथे महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी
ग्रापं कार्यालय व जिप शाळा कवठी येथे महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी
कवठी प्रतिनिधी – सावली लगतच असलेल्या कवठी येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळा याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन सरपंच सौ कांताबाई बोरकुटे यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुधाकर श्रीकोंडावार हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास बट्टे उपसरपंच, ग्रापं सदस्य राकेश घोटेकार, सुनिल कुळमेथे, रंजना बोरकुटे ग्रामविकास अधिकारी पारधी,पो.पा. सचिन सिडाम तंमुस अध्यक्ष टिकाराम म्हशाखेत्री, समुदाय आरोग्य अधिकारी वनकर, अंगणवाडी सेविका राऊत, कोसरे, आशासेविका संगिता गेडाम ग्रापं चे सर्व कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शाळेचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्य विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणले पाहिजे, गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह या त्रिसूत्रीचा प्रत्यक्ष जीवनात आपण वापर केला पाहिजे. त्यांनी दिलेला लढा हा केवळ इतिहास नसून एक जीवन आहे. गांधीजींच्या विचारांमधून महिलांना सर्व क्षेत्रात समान संधीच्या वाटा निर्माण झाल्या. गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मांडले.मिठाचा सत्याग्रह स्वदेशीचा वापर, भारत छोडो आंदोलन ग्रामस्वराज्याची संकल्पना,गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेमधील दिवस येथील त्यांचे अनुभव,गांधीजींनी घेतलेले शिक्षण, बॅरिस्टर महात्मा असे मांडलेले विचार महत्त्वपूर्ण होते. याप्रसंगी लालबहादूर शास्त्री यांचे विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.
गांधीजींच्या कार्याची सविस्तर माहिती मुख्याध्यापक नैताम सर यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दळांजे सर तर आभार शिक्षक मांडाळे सर यांनी मानले.



