समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न
आज दिनांक 30 सप्टेंबर, 2022 ला समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्मस विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद बडवाईक सर होते. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर पंडित फुलझेले सर रमाबाई आंबेडकर महाविद्यालय सावली, यांनी समाजशास्त्र विषयाच्या संदर्भात, विविध क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे संधी उपलब्ध आहेत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक वाळके सर इंग्रजी विभाग प्रमुख, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खत्री कॉलेज चंद्रपूर यांनी समाजशास्त्र विषयाचे महत्त्व सांगितले.तसेच डॉक्टर बागडे सर, डॉक्टर वासेकर सर, प्राध्यापक खोब्रागडे मॅडम, प्राध्यापक गुरनुले मॅडम यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यक्रमात सर्व समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे नियुक्त सदस्य उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे परिश्रम केला . समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिवाकर उराडे सर यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविक केले तसेच या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन नवनियुक्त समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष कुमारी साक्षी देवानंद गन्नाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अभ्यास मंडळाचे योगदान दिलं आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले .



