पुन्हा विजयी होणार जय सहकार पॅनल: संस्थेचे अध्यक्ष यांचा विश्वास

•संस्थेच्या यशस्वी वाटचालीकडे द्यावे जनतेने लक्ष
•निवडणूक एकतर्फी होण्याचा माजी अध्यक्षांचा विश्वास
वणी (21.जुन): श्री रंगनाथ स्वामी सहकारी पातसंस्थेची निवडणूक रविवार 26 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. गेल्या 21 वर्षात श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा विस्तारित करण्याचे काम जय सहकार पॅनल द्वारे करण्यात आले आहे. सोबतच एका शाखेवरून सुरवात करून विविध जिल्ह्यात आज 22 शाखा निर्माण करण्याचे श्रेय जय सहकार पॅनलला जाते. या कार्याची दखल घेत जनतेने जय सहकार पॅनलच्या छत्री या बोधचिन्हावर फुलीचा शिक्का मारून विजयी करण्याचे आव्हाहन संचालकाद्वारे करण्यात आले आहे.
1989 मध्ये फक्त 240 सदस्य असलेल्या श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेची सदस्य संख्या आज 55 हजाराच्या वर नेण्याचे महत्वाचे कार्य जय सहकार पॅनेलने केले आहे. यशस्वी घोडदौड करीत आज संस्थेला सर्वोच्च शिखरावर पोहचविण्याचे काम जय सहकार पॅनल द्वारे करण्यात आले आहे हे विसरून चालणार नाही. विरोधक आज अनेक खोटे आरोप करून या पॅनलला हटविण्याचे कटकारस्थान करीत आहे. घरोघरी जाऊन आपला प्रचार करीत आहे.
तरी खोट्या व फसव्या प्रचाराला बळी न पडण्याचे आव्हाहन जय सहकार पॅनल द्वारे करण्यात आले आहे. इतक्या वर्षात जे कार्य केले त्याकडे जनतेने लक्ष देऊन विजयमाला जय सहकार पॅनलला गळ्यात टाकण्याची विनंती करण्यात आली आहे.जय सहकार पॅनल मध्ये अनुभवी तासवच तज्ञ मंडळींचा समावेश आहे.
यामध्ये चिंतामण पांडुरंग आगलावे, लिंगारेड्डी मल्लारेड्डी अंडेलवार, पुरुषोत्तम हनूमंतु बद्दमवार, सुधीर जनार्धन दामले, सुनील देवराव देठे, परीक्षित अरुनराव एकरे, देविदास पांडुरंग काळे, विवेकानंद आबाराव मांडवकर, घनश्याम वासुदेवराव निखाडे, हरिशंकर मंसाराम पांडे, भूपाळराव रघुनाथ पिंपलशेंडे, अरविंद वसंतराव ठाकरे तर महिला गटामध्ये सौ. निमाताई सुनील जीवने, छायाताई अशोक ठाकुरवार यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.