ग्रामपंचायत कार्यालय कवठी येथे “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा.
ग्रामपंचायत कार्यालय कवठी येथे “शिवस्वराज्य दिन” उत्साहात साजरा.
कवठी प्रतिनिधी,
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा असल्याने दरवर्षी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.
सावली तालुक्यातील कवठी ग्रामपंचायत कार्यालयात व शिवाजी चौक येथे
भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करन्यात आले व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही मन न दाखवणे, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमिपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधीशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जीवाभावाचे मावळे एकत्र करून हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकूम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले होते.
त्याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित गावच्या सरपंच सौ. कांताबाई बोरकुटे उपसरपंच श्री विलास बट्टे कु राकेश घोटेकार ग्रापं सदस्य श्री सुनिल कुळमेथे ग्रापं सदस्य सौ संगिता पाल ग्रापं सदस्य मनिषा कोसरे ग्रापं सदस्य शितल गोरडवार ग्रापं सदस्य रंजना बोरकुटे ग्रापं सदस्य डिम्पल धोटे ग्रापं सदस्य सचिव आकनुलवार पो. सचिन सिडाम तंमु. अध्यक्ष टिकाराम म्हशाखेत्री ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका शिवस्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत पुतणेलवार सदस्य हरिदास चुदरी आणि गावातील नागरिक उपस्थित होते. संचालन राकेश घोटेकार यांनी तर आभार नितीन राजूरकर यांनी मानले.



