शेतकरी बांधवांना खुश खबर, पी एम किसान योजनेचा ११ वा हप्ता आज मिळणार
शेतकरी बांधवांना खुश खबर
पी एम किसान योजनेचा ११ वा हप्ता आज मिळणार
*पी एम किसान ई-केवायसी ची तारीख पुन्हा वाढली*
Pm kisan E-kyc : ई-केवायसीची शेवटची तारीख 31 जुलै पर्यंत वाढली.!
ई-केवायसी’ म्हणजेच शेतकऱ्यांना आपले बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी आतापर्यंत अनेकवेळा मुतवाढ देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही शेतकऱ्यांमध्ये बाबत जनजागृती झालेली नाही. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यात या पीएम किसान योजनेचे काही लाभार्थी kyc करायचे राहून गेले आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक असतानाही शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. योजनेचा 11 वा हप्ता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. यासंबंधीची सर्व प्रक्रिया ही पूर्ण झाली असताना ‘ई-केवायसी’ केले नसल्याने अनेकांना 11 हप्ता जमा होतो की नाही याबाबत संभ्रमता आहे. शिवाय आता लाभार्थांकडे 31 जुलै पर्यंत कालावधी दिलेला आहे.
*‘ई-केवायसी’ नाही केले तर काय?*
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी’ई-केवायसी’ करणे हे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा लाभ मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया स्वत: लाभार्थ्यांलाही करता येते शिवाय ग्राहक सेवा केंद्रावरही आधार क्रमांक सांगून प्रक्रिया पूर्ण करता येते. सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ‘ई-केवायसी’ करता येते.
*31 जुलै शेवटची मुदत*
‘ई-केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ करण्यात आली आहे. तसेच आता यापुढे मुदतवाढ नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उर्वरीत दिवसांमध्येच ही प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यात कायम आर्थिक मदत होणार आहे. योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया राबवली आहे. गेल्या काही वर्षामध्ये जे पात्र नाहीत अशा नागरिकांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. ही बाब निदर्शनास आल्यावर ‘ई-केवायसी’ ला सुरवात करण्यात आली आहे. मात्र, शेतकरी अजूनही याबाबत गंभीर नाहीत.