आज मनसेचा धडक मोर्चा……….
•पहापळ बालिका अत्याचार प्रकरण
•19मे, गुरुवारी सकाळी 11 वाजता मोर्चाचे आयोजन
मारेगाव (19 मे):- तालुक्यातील पहापळ येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणी 19 मे, गुरुवारला तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आले आहे.. सदर प्रकरण सरकारी पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावे. सदर खटला जलदगती न्यायालयामध्ये चालविण्यात यावा. नराधम आरोपी मारोती भेंडाळे ( 30 ) याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 19 मे, गुरुवारी सकाळी 11 वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा धडक मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष अंजूम शेख,
जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वात निघणार आहे. मोर्चाची सुरुवात येथील जिजाऊ चौकातून मुख्य मार्गाने मार्गक्रमण करित थेट तहसील कार्यालयावर धडकणार आहे. चिमुकलीला न्याय मिळून देण्यासाठी परिसरातील समस्त नागरिकांनी या धडक मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केले आहे.