“गाव तिथे निर्भया पथक स्थापन करणार” – किरण देरकर
•बालिकेला न्याय देण्यासाठी ” सन्मान स्त्री शक्तीचा” महिला फाउंडेशन आक्रमक “………..
वणी (18 मे):- पहापळ येथील समाजविघातक कृत्याचा सर्व स्तरातून निषेध होत असताना “सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार , वणी उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्य प्रशासनाला निवेदन पाठवीत न्यायालयीन प्रकरण फास्ट ट्रॅक चालवून या क्रूर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनातून व दिनांक 18 मे बुधवार रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वणी येथील विश्रागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली.
९ मे रोजी पहापळ येथील विकृत नराधमाने अवघ्या सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून काटेरी फासात फेकले.सुदैवाने जीव वाचलेल्या बालिकेच्या हाकेने आरोपी मारोती भेंडाळे नराधमाचे बिंग फुटले आणि पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
या घटनेचा समाजमनात तीव्र शब्दात निषेध होत असतांना वणीतील सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशनचा अध्यक्षा किरण देरकर यांचा नेतृत्वात शेकडो महिला यांनी तहसीलदार व वणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देत नराधमाची न्यायालयीन प्रकरण फास्टट्रॅक चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच गाव तिथे दामिनी पथक स्थापन करणार त्यात प्रत्येक गावात 10 प्रतिष्ठीत महिला व 10 प्रतिष्ठीत पुरुष त्या दामिनी पथकात राहणार असल्याचेही पत्रकार परिषदेत किरण संजय देरकर यांनी सांगितले .
या पत्रकार परिषदेत उपस्थिती म्हणून किरण संजय देरकर, वृषाली खानझोडे, सुरेखा ढेगळे, इंदू किंन्हेकार, कविता सोयाम व अनेक महिलावर्ग होत्या.
बालक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा-
” बालकांचा हक्क व सुरक्षा कायदा, महिलांचे लैंगिक शोषण या अंतर्गत महिला बाल संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज आहे.” किरण संजय देरकर, सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन, वणी.