राजूर पेट्रोल पंपाच्या बाजूला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला…..

•ओळख पटविण्यास वणी पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन…..
वणी (18 मे ):- तालुक्यातील राजूर फाट्यालगत पेट्रोल पंपाच्या कुंपनाचा बाजूला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असुन ओळख पटल्यास वणी पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर अनोळखी व्यक्ती पुरुष जातीचा वय अंदाजे ३५ ते ३८ वर्षे वयोगट, उंची अंदाजे पाच फुट चेहरा गोल घुमट असून काळ्या रंगाच्या केसाची दाढीमिशी आहे. रंग गोरा, बांधा सडपातळ असून गळ्यामध्ये एक माळ घातलेला, कमरेवर अंडर वियर काळ्या रंगाचा व अर्धनग्नावस्थेत होता.
काल १७ मे रोजी दुपारी १.३७ वाजताच्या दरम्यान पेट्रोल पंपाचा सीसीटिव्ही फुटेजचा प्राप्त माहितनुसार तो अज्ञात इसम पेट्रोल पंपाच्या कुंपणाजवळ आला व एका छोट्या झाडाखाली आश्रय घेतला व तसाच बसून राहिला असे स्पष्ट त्या सीसीटिव्हीचा माध्यमातून दिसुन येतं आहे.परंतू त्या ठिकाणी का व कशासाठी आला ? महत्वाचे तो अर्धनग्न का होता हे देखिल अनुत्तरीत आहे.
या अनोळखी इसमाच्या पंचनामा करुन कुजलेल्या प्रेताला शवविच्छेदन वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
“सदर मृतक इसमाचे अद्याप पावेतो ओळख पटली नाही. तरीही वरील वर्णनाचे अनोळखी इसम हरविले किँवा घराबाहेर गेले असल्यास किंवा ओळख पटल्यास वणी पोलीस स्टेशनला येऊन संपर्क करण्याचे आवाहन पि. एस आय शिवाजी टिपूर्णे यांनी केले आहे.”