हा रस्ताच असाय की, येथे पाहण्यास मिळतात डान्सीग कार अन् गाड्या……..!!!!!!!!!!
•18 नंबर पुलापासून जाणारा वारगाव ते चारगाव रस्त्याची दुर्दशा….
•पायी चालण्याऱ्यानाही करावी लागते तारेवरची कसरत
वणी( 17 मे ) :- परिसरातील बहुतांश रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः वाट लागली आहे. जागोजागी लहान मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा समस्त रस्ता अतिशय खराब होत असल्याने याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांमधून होत आहे. आता पावसाळ्यात तर या रस्त्यांवर वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कायर ते मुकुटबन रस्त्यावरील 18 नंबर पुलापासून जाणाऱ्या वारगाव- चारगाव सहा ते सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था ही अत्यंत बिकट झाली आहे. चारगावला हा रस्ता जोडला गेला आहे. या रस्त्याचे चारगावपर्यंत तीनतेरा झाले आहे. वारगाव त्यानंतर हा रस्ता असून तो थेट चारगावला जातो. चारगावचा पुढे हा रस्ता चांगला झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून व ग्रामस्थांकडून होत आहे. मेहुणबारे शिदवाडी रस्ता चाळीसगाव- धुळे महामार्गावरील मेहुणबारे ते शिदवाडी हा चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यालगतच वार्गावांत घरे आहे.सध्या या रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी पंक्चर होते. छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. या रस्त्यालगतच्या नाल्यापर्यंत खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्याचे खडी वर आली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकरांनी केली आहे. रस्त्यावरील डांबर निघून वर आले आहे. साईडपट्ट्या खोल गेल्याने अपघाताची भीती वाढली आहे. या रस्त्यावर शासनाचा मोठा खर्च झालेला असला तरी रस्त्याची पाहिजे तशी दुरुस्ती न झाल्याने रस्ता खराब झाला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढल्याने लहान मोठे अपघात वाढले आहेत. वारगाव रस्ता खड्ड्या व चारगाव मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता खराब असल्याने ग्रामस्थांना येथे दहा किलोमीटर अंतराच्या फेऱ्याने यावे लागते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी समस्या मांडल्या. मात्र, त्यांची दखलच कोणी घेत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. पावसाळ्यात या या रस्त्यावरून चालणे अवघड होते. शारीरिक व्याधींचे मूळ खड्ड्येमय रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे. अनेकांमध्ये पाठीचे व मानेचे दुखणे बळावले आहे. बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हे रस्ते पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतो. रात्री- अपरात्री हे रस्ते वाहनांसाठी घातक ठरत आहे. शारीरिक व्याधींचे मूळ ठरलेल्या या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
“डान्सींग कार म्हटले की आठवतो पीके चित्रपटात. पण इथे तर रोजच रस्त्यावर डान्सींग करणाऱ्या कार आणि गाड्या पाहण्यास मिळतात. कारण तसे जरा वेगळेच असून, याला जबाबदार प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना डान्सींग कारचा अनुभव येतोच.” – गावातील नागरीक…(वारगाव)