ॲड.कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

•मोठ्या संख्येने लाभार्थांनी शिबीराचा लाभ घेतला
वणी (16 मे ):- ॲड.कुणाल चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि. 14.5.2022 शनिवार करण्यात आले होते.यामध्ये नेत्र तपासणी ,नाक-कान-घसा, ह्रदय रोग ,स्त्रीरोग आणी नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कर्ण बधिर लोकांसाठी कर्ण यंत्राचे वाटप करण्यात आले.यामध्ये मोठ्या संख्येने लाभार्थांनी शिबीराचा लाभ घेतला .सोबतच दुरुन आलेल्या नागरिकांसाठी सभागृहात भोजन व्यवस्था करण्यात आले.
कार्यक्रमाचावेळी व्यासपीठावर भाजपा नेते विजय चोरडिया ,आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, माजी.नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे एस.बि.आय लाईफचे शर्मा, राजा बिलोरीया,ॲड.कुणाल चोरडिया,शोभादेवी पारसमल चोरडियासह मोठ्या संख्येने बिजेपी कार्यकर्ते उपस्थित होते.