टिकाराम कोंगरे व तांबेकर यांच्या नेतृत्वात विविध सहकारी संस्था पळसोनीवर संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी.
•ही निवडणूक नियोजन बद्धपणे लढवून विरोधकांना धूळ चारली….
वणी (16 मे ) :- काल दिनांक १४ – ५ – २०२२ रोजी पार पडलेल्या पळसोनी सहकार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते, व या निवडणुकीत विरोधकांच्या मोठ मोठ्या नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावली होती. यामुळे या निवडणूकीची संपूर्ण धुरा जि. म. स. बँकेचे अध्यक्ष टिकारामजी कोंगरे व तांबेकर यांनी आपल्या खांद्यावर घेऊन ही निवडणूक नियोजन बद्धपणे लढवून विरोधकांना धूळ चारत आपल्या पॅनल चे संपूर्ण उमेदवार निवडून आणले.
या यशात पळसोनी व झरपट येथील नेते मंडळी व मतदार यात प्रामुख्याने जगदीश चौधरी, बंडुजी खांडारकर, सरपंच पळसोनी, जीवन बेलेकर, महेश तांबेकार, गजानन बेलेकार, दिवेश भट, अर्जुन खैरे, अशोक बोढेकर, डेव्हिड पेरकावार, अनिल डवरे, राजू बोडेकर, शंकर मसरे, राजू काकडे, बंडू खैरे, मोहन थाटे आणि येथील युवक वर्गाचा मोलाचा सहभाग लाभला.
यात विजयी उमेदवार१) सुशीला दत्तूजी बेलेकर,२) माला अरुण भोयर,३) जगदीश उत्तमराव चौधरी,४) थोटे रामचंद्र महादेव,५) झाडे राजू नत्थुजी ,६) तांबेकर अतुल मधुकर,७) बोढाले ऋषी सदाशिव,८) बेलेकर भास्कर भाउराव,९) बेलेकर द्यानेश्र्वर राजेश्वर,१०) भट देवराव गणपत,११) वैद्य खुशाल पांडुरंग,१२) पांडुरंग उद्धव वाघमारे ,१३) पुरुषोत्तम थाटे हे झाले.
या विजयी उमेदवारांच्या सत्काराचा कार्यक्रम टीकारामजी कोंगरे व तांबेकर साहेब, CO रंगनाथ स्वामी सोसायटी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमाचे संचालन दाविद पेरकावार, काँग्रेस तालुका सचिव वणी यांनी केले.