पहापळ येथील अत्याचार प्रकरणातील पीडित कुटूंबास राजु उंबरकरांकडुन मदतीचा हात
• आर्थिक मदत देवुन चिमुकलीच्या वैधकीय ईलाजाची उचलली जबाबदारी
• बालिकेस न्याय मिळण्यासाठी ऍड. उज्वल निकम साठी करणार मागणी
मारेगाव (16 .मे):-सहा वर्षीय चिमुकलीवर एका तीस वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून पिडितेस चक्क काटेरी फासात टाकल्याची संतापजनक घटना तालुक्यातील पहापळ येथे 9 में रोजी घडली.या प्रकरणातील पीडित कुटूंबास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकरांनी भेट देवुन मदतीचा हात दिला आहे.
9 मे च्या सायंकाळी तालुक्यातील पहापळ येथे मन सुन्न करणारी हृदयद्रावक, तितकीच मानव जातीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली.पीडितेच्या घर शेजारच्या एका घरी विवाह समारंभाचा कार्यक्रम सुरू असतांना सायंकाळी 7.30 वाजताचे दरम्यान एका सहा वर्षीय बालिकेस तिच्या आजीने गावालगत असलेल्या शेतात तिला शौचास नेले होते.मात्र आजी घराशेजारी आल्यानंतर उशिरापर्यंत नात कार्यक्रमस्थळी आलीच नसल्याने ही बाब वाऱ्यासारखी गावात पसरली.
रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने बालिकेचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांनी रात्रभर गावा लगतचा परिसर अखा पिंजून काढला.विशेष म्हणजे यावेळी आरोपी सुद्धा गावाच्या लोकां सोबत शोधमोहीमेत सहभागी होता. परंतू ती कुठेच आढळली नाही.मात्र 10 में च्या दुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून एक कि.मी.अंतरावर एका काटेरी फासात ती रक्तबंबाळ अवस्थेत चिमुकली आढळली.दरम्यान वैधकीय तपासा अंती चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.दरम्यान पिडीत सहा वर्षीय चिमुकलीला विश्वासात घेतले असता.
तिने आरोपीचे थेट नाव सांगत नराधमांने केलेल्या कृत्याची आपबीती सांगितले.दरम्यान मारेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून तत्काळ तपासचक्रे फिरवीत आरोपी मारोती मधुकर भेंडाळे (30) याला राळेगाव तालुक्यातील वडकी येथून अटक करण्यात आली.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक पुढाऱ्यांनी पहापळ येथे पीडित कुटूंबास सांत्वन भेट दिली.मात्र मदतीचा हात कोणत्याच राजकीय पुढाऱ्यांनी समोर केला नाही.मात्र मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी 15 में रोजी सायंकाळी थेट पीडितेच्या घरी भेट दिली असता त्या सहा वर्षीय निरागस चिमुकलीला बघून अक्षरशः राजु उंबरकरांचे अश्रू अनावर झाले.त्या नराधमावर कठोर कारवाई करण्यासाठी मनसे प्रशासनास भाग पाडेल अशी ग्वाही देत पीडित कुटूंबास रोख आर्थिक मदत दिली व बलिकेच्या पुढील वैधकीय उपचाराची जबाबदारी घेतली.व या प्रकरणासाठी सरकारी वकील ऍड.उज्वल निकम साठी मागणी करू असेही ग्वाही दिली.
यावेळी मनसेचे महिला जिल्हा अध्यक्ष सौ.अर्चना बोदाडकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे,वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव शहर अध्यक्ष शेख नब्बी, वणी शहर शिवा पेचे,महिला शहर अध्यक्ष सिंधूताई बेसकर,मनवीसे शहर अध्यक्ष चांद बहाडे,आकाश खामनकर, प्रभा ढेंगळे आदी उपस्थित होते.