डोर्ली येथील खून प्रकरणाचे रहस्य अखेर उलगडले

•जुन्या वादाचा बदला घेण्यातून झाली विलास गोहोकारची हत्या
¶ बार मध्ये दारू ढोसत रचला कट
¶ खुणातील चारही आरोपीना अटक.
¶ लोकेशन, गुप्त माहितीतून उलगडले खुनाचे रहस्य.
मारेगाव -जनावरे मारून जुन्या वादाचा बदला घेण्याचा कट बारमध्ये दारु पीत चौघाणी तयार केला. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची काळजी पूर्वक जुळवाजुळव केली.परंतू ऐन वेळी मृतक झोपेतून जागा झाल्याने आणि आता ओळख पटल्याने आपली बदनामी होईल या भीतीने चौघांनी मिळून शेतकऱ्यांना गळा आवळून संपविण्याचा प्रकार डोर्ली खून प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्यावर ६ दिवसांनी समोर आला आहे.
डोर्ली येथील शेतकरी विलास करनुजी गोहोकार हे ८ मे चे रात्री पिकांचे राखणी साठी शेतात गेले असता गळा आवळून खून झाला होता. आरोपीनी घटना स्थळी कोणताही पुरावा सोडला नसल्याने आणि पोलिसांनी बोलाविलेले स्वाण पथकही कुचकामी ठरल्याणे खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान मारेगाव पोलिसा समोर उभे ठाकले होते.मोबाईल लोकेशन, गुप्त माहिती आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी यांच्या कड्या जोडत नेत मोठया शिताफीने या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलीस यशस्वी झाले आहे.
आरोपी विशाल बापूराव झाडे वय ३२वर्ष याला संशया वरून घटनेच्या दुसऱ्या दिवशीच ताब्यात घेतले होते. परंतु ताब्यातील आरोपी विशाल चतुर असल्याने पोलिसांची सतत दिशाभूल करीत होता.त्यामुळे नेमका खून कोणी केला याचे रहस्य गडद बनले होते.परंतु मोबाईल लोकेशन आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चतुर आरोपीला बाजीराव दाखविताच खुनाचे रहस्य उलगडले.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ताब्यात घेतलाला आरोपी विशाल झाडे व मृतक विलास गोहोकार यांचेत वाद होता.तर दुसऱ्या तीन आरोपी पैकी दोघांचा मृतकाच्या मोठया भावा सोबत वाद होता.याचा बदला म्हणून जनावरांना विषारी इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा बेत केला.त्यासाठी लागणारे विषारी इंजेक्शन मेडिकल मधून खरेदी केले.
रात्री पुन्हा मारेगाव येथी बार मध्ये बसून चौघाणी ही दारू ढोसली.आणि जवणावरणा इंजेक्शन देऊन ठार मारन्यासाठी दोन मोटारसायकलने चौघेही डोर्ली येथे गेले. जनावराना विषारी औषध देण्यासाठी गोठयात जाताच मृतक विलास गोहोकार यांना जाग आली. त्यांच्यात झटापट झाली. आपण ओळखल्या गेल्याने आपली बदनामी होईल या भीतीने एका आरोपीने मृतकाचे मजबूत पाय पकडले तर दोघांनी गळ्याला दुपट्टा करकचून आवळला.त्यामुळे काही मिनिटातच विलास गोहोकार यांचा मृत्यू झाला.
खुनाची घटना घडताच आरोपी विशाल झाडे पळून गेला.तीन आरोपीने मृतक विलास गोहोकार याना गोठ्या बाहेर १०० फुटावर फेकून दिले.हा खून विलास झाडे, रा.डोर्ली यांचे सोबत अजित गैबिदास फुलझेले वय ३९ वर्ष,प्रशांत भोजराज काटकर वय ३४वर्ष,रुपेश शंकर नैताम वय २९ वर्षे सर्व राहणार नवरगाव यांनी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी चारही आरोपीला न्यायालया समोर हजर करून बुधवार पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली.या प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे.