शहराची कायदा व सुव्यवस्था एकाच ठाण्याचा राम भरोसे…
•पोलीस स्टेशनवर भार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था सांभाळताना तारेवरची कसरत
•ठाण्याचा हद्दीत टोळी भांडणे,महिलांचा तक्रारी, अल्पवयीन मुलींचे प्रकरणे प्रलंबित व अनेक गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
•कर्मचारी कमी असल्याने ठाण्यात गोदळच गोदळ अशी माहिती
•वणी शहराला ग्रामीण व शहर पोलीस स्टेशनची गरज
वणी (15 .मे. ) :- तालुक्यातील लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तसेच औद्योगिक क्षेत्र असल्याने विविध राज्यातील नागरिकांचे वास्तव्य या ठिकाणी आहे.त्यामुळे वणी ठाण्याचा हद्दीत टोळी भांडणे,महिलांचा तक्रारी, अल्पवयीन मुलींचे प्रकरणे प्रलंबित व अनेक गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर अंकुश मिळविण्यासाठी व संपूर्ण शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वणीचा एकाच पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे . 

वणी तालुक्यात 162 गाव असून 100 ग्रामपंचायती आहेत .या संपूर्ण गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही वणी शहरातील पोलीस स्टेशन व शिरपूर पोलीस स्टेशन अशा दोन पोलीस ठाण्यावर आहेत तर काही गावे मुकुटबन पोलीस स्टेशनला जोडली आहे. कारण गावांचा व लोकसंख्येचा तसेच पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेऊन बिट पाडण्यात आले आहे. परंतु आता शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वणी शहराला एक समांतर असे ग्रामीण पोलीस स्टेशनची गरज असल्याचे दिसून येत आहे. 
कारण वणी पोलीस स्टेशनवर 108 गावांचा भार आहे. त्यामुळे टोकावरच्या गावात एखादी घटना घडल्यास पोलिसांना पोहोचायला वेळ लागत असल्याने त्या घटनेचे स्वरूप कसे असेल सांगता येत नाही . कारण वणी तालुका औद्योगिक क्षेत्राने व्यापलेला असल्याने मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, चुनखडी, सिमेंट यासारख्या कंपन्या असल्याने यामध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा भरणा आहे .त्यांचे खानपान व्यवहार भिन्न असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असल्याने वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात आहे गुन्हेगारीत वाढ झाली आहे . एका पोलीस स्टेशनवर भार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
तालुक्यातील राजूर, कायर, घोंसा, शिंदोला, वणी ही मोठी बाजारपेठ असल्याने सभोवताली गावांची वर्दळ असते. त्या वर्दळीत केव्हा वादावादी होऊन त्याचे रूपांतर भांडणात होईल हे काहीही सांगता येत नाही त्यासाठी त्या गावात पोलीस चौकी देऊन तेथे सतत पोलिसांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. तेव्हा वणी शहराची वाढती लोकसंख्या पाहता वणी शहराला एक समांतर असे ग्रामीण पोलीस स्टेशन देण्यात यावे. तरच शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करता येईल .
त्यातल्यात्यात पोलीस कर्मचारी कमी असल्याने कायदा व सुव्यवस्थेत अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा शासनाने वणी शहराच्या गुन्हेगारीचा विचार करून त्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे निर्मिती करून लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




