बुद्ध जयंती निमित्त मारेगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
• जय भीम उत्सव समिती मारेगाव चे आयोजन
नागेश रायपुरे, मारेगाव:- सोमवार दिनांक 16 में रोजी तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त धम्मराजीका बुद्ध विहार मारेगाव येथे एक दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन जय भीम उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यात सकाळी 9 वाजता येथील धम्मराजीका बुद्ध विहारात अभिवादन सोहळा तर 10 वाजता आयु.लताताई तेलतुंबडे याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संस्कार पाठाची शिकवण किती आवश्यक आहे? या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे.तर सायंकाळी 6 वाजता शहरात “युद्ध नको बुद्ध हवा” संदेश पोहचवण्यासाठी रथावर गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवून “शांतीरथ” कँडल मार्च काढण्यात येणार आहे.तर 7 वाजता समूह भोजन तर दरम्यान ऑर्केस्ट्रा स्वरधारा प्रस्तुत “गाथा बुद्ध भीम गीतांची” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवसीय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय भीम उत्सव समिती तथा मारेगाव शहरातील समस्त बौद्ध उपासक उपासिकांनी केले आहे.



