दिल्लीहून आलेल्या नवीन 3 रूग्णांचे गडचिरोलीत कोरोना पॉझिटीव्ह,
दिल्लीहून आलेल्या नवीन 3 रूग्णांचे गडचिरोलीत कोरोना पॉझिटीव्ह,
जिल्हयातील एकुण बाधित 47 तर सक्रिय कोरोना बाधित 10 रूग्णावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे..
विदर्भ 24न्यूज़
जिल्हा प्रतिनिधि/गडचिरोली :– गडचिरोली येथे काल रात्री नव्याने तीन प्रवाशांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या पुन्हा 10 वर पोहचली. यामुळे जिल्हयात एकुण कोरोना बाधितांची संख्या 47 झाली. तर 36 कोरोनामुक्त झालेल्यांना यापुर्वीच दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्या 10 सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने दिल्ली येथून स्वगावी आलेल्या रूग्णांना गडचिरोली शहरातील वनश्री कॉलनीतील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सदर तिनही रूग्ण 7 जूनला गडचिरोलीत आले . यातील दोन रेल्वेने तर एक जण विमानाने प्रवास करून आला आहे. आल्यानंतर त्यांना संस्थाम्तक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यातील तीनही पुरूष रूग्ण 28 ते 30 वयोगटातील असून कोणत्याही प्रकारची कोरोना लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. या तिनही रूग्णांच्या विलगीकरण ठिकाणच्या संपर्कातील इतर पाच प्रवाशांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले होते. आता सात ते आठ दिवसांनी त्यांचेही दुबार नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत .



