वणी-लालपुलिया रस्ता बनला धुळीच माहेरघर
•श्वसनाच्या आजार व अपघाताला निमंत्रण…….
•नागरीकांना जिवंतपनी मरण यातना भोगाव्या लागत आहे.
•नागरिकांचा आरोग्यप्रश्नांसाठी स्थानिक नेते मागे का?-
वणी (12 मे):– धुळीमुळे शहरातील अनेक रस्ते श्वसनाच्या आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहेत. एकप्रकारे हे रस्ते वणी व चिखलगावकरांना आजारांकडे घेऊन जात असल्याचे चित्र आहे; तर दुसरीकडे शहरालगतच्या रस्त्यावरील धुळीमुळे शेतातील पीके, घरे ,श्वसन घेण्यात त्रास,दमा या सारख्या आजारांना जणु काही प्रशासनच निमंत्रण देत आहे.कारण स्थानिक प्रशासन कोलडेपो हटावचा भूमिकेत अग्रेसर का नाहीं यात नेमके येथील स्थानिक नेत्यांचे घोडे अडले कुठे? निवडणुकीचा काळातच समोर दिसणार का अशी खमंग चर्चा देखील या परीसरात नागरिक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चिखलगाव लालपुलिया हा रस्ता अतिधुळीचा रस्ता झाला आहे. तालुक्यात व विशेष चिखलगाव येथे देखील मोठ मोठें नेते राहतात मग काय करत आहे गावातील नेते चिखलगावासाठी? स्थानिक नागरिकांना जिवंतपणीच मरण यातना भोगाव्या लागत आहे. गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कोणीही समोर येण्यास का तैयार नाहीं हे कोडच..!!! परंतु, नेते स्वतःचा शेकोटी पोटीच का? त्यांना जनआरोग्याची तमा नसल्याचे स्पष्ट होते. असे देखील नागरीकांकडून ऐकु येत आहे.

मुख्य म्हणजे, या प्रश्नाबाबत कुणीही पाठपुरावा करताना दिसत नाही. काही मंडळी देखावा म्हणून एखादे निवेदन देऊन मोकळे होत असल्याचे चित्र आहे. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून पुढारी कारने बाहेरगावी ये-जा करतात. परंतु, सर्वसामान्य जनता या रस्त्यावर धुळीने माख आहेत.
धुळीने या रस्त्याची अशी गत आहे. कोल डेपोबद्दल अनेकदा निवेदने आंदोलन झाले. पण प्रत्येकवेळी आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे वणी शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोलडेपोमुळे अवस्था ही दयनीय आहे. दुचाकीवर चालताना जर मुलेबाळे सोबत असली, तर त्या मुलाबाळांचा धुळीमुळे अक्षरक्षः दम कोंडतो. रस्त्यावरील धूळ डोळ्यात जात असल्याने डोळे अती लाल होत आहेत. ही वस्तुस्थिती जिल्ह्यातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींना, स्थानिक नेत्यांना व मुंग गिळुन असलेल्या प्रशासनाला माहिती आहे. वणी- चिखलगाव जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारील मोठ मोठें घरांवर धुळीचे चादरच तयार झाली आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे या रस्त्यावर प्रवास करणारे बाहेरील लोक अनेकदा लाखोली वाहताना दिसतात.
2) बॉक्स
लालपुलीया येथे नाकाला रुमाल हवाच……….
” जवळपासच्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी सहसा अनेकजण दुचाकीनेच जातात. मोटारसायकलने गेल्याने एकतर लवकर पोहोचता येते. त्याशिवाय बसची वाट पाहात बसण्याची गरज नाही. मात्र दुचाकीने जात असताना नाकाला रुमाल असणे आवश्यक आहे. वणी – चिखलगाव मार्गावर प्रचंड धुळीचा वाहनधारकांना सामना करावा लागतो.”…………
2) बॉक्स………
रात्री फारच पंचायत……….
“रात्रीच्या वेळी रस्त्यांवर धुळीमुळे अंधार असतो. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण असते. त्यात जर काळीकुट्ट धूळ डोळ्यात गेली तर अपघाताचीही शक्यता असते. तर रस्त्याचा कडेलाच डेपोधारक स्थानिक अतिक्रमण करून आपली पोळी शेकत असल्याने धुळीचा त्रास वाढत आहे.”……….



