गावात उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून गावाचा विकास साधावा- भास्कर पेरे पाटील
मारेगाव 11मे :- गावाचा विकास साधण्यासाठी सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता गावातच उत्पनाचे स्त्रोत निर्माण करा व यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून,गावाचा विकास साधावा असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भाष्कर पेरे पाटील यांनी केले.
मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यात आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे “ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग” या विषयावर जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. ते पुढे बोलत असतांना म्हणाले आपल्या गावातील माणूस शंभर वर्षे जगण्यासाठी गावाच्या सोयी सुविधां सह गावात स्वच्छतेवर, आरोग्यावर भर दिला पाहिजे.तसेच सरपंचाला गावाची आई झाल्या शिवाय गावातील गावाचा विकास साधता येणार नाही.असे त्यांनी सरपंच मेळाव्यात आपल्या आदर्श गावाचे वेगवेगळे उदाहरणे देवुन उपस्थिताना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार होते,तर उदघाट्क यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकचे उपाध्यक्ष संजय देरकर होते. विशेष अतिथी म्हणून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकर तर स्वागता अध्यक्ष म्हणून कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे होते.तर प्रमुख पाहुणे म्हूणन माजी जि प.सदस्य अरुणा ताई खंडाळकर, अनिल देरकर,माजी पं. सभापती सौ. शीतलताई पोटे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, कृ.उ.बा. समितीचे उपसभापती वसंतराव आसुटकर,तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मारोती गौरकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे,तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अॅड देवा.पाचभाई यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तालुका सचिव सुरेश लांडे,तालुका उपाध्यक्ष मालाताई गौरकार,जगदीश ठेंगणे, प्रविण नान्हे,चंदुजी जवादे,सुरेखा चिकराम, पांडुरंग ननावरे,विनोद आत्राम, रविराज चंदनखेडे,प्रेमीला आदेवार, नीलिमा थेरे, दिलीप आत्राम,चंद्रकांत धोबे, शारदा गौरकार, वैशाली परचाके,आदींनी आदींनी परिश्रम घेतले.



