आयपीएल क्रिकेट सट्ट्याची ऑनलाईन उतारवाडी घेणाऱ्या 4 आरोपींना रंगेहाथ अटक…..
•यवतमाळ पोलिसांचा धाडीनंतर शहर पोलीस यंत्रणा सतर्क…
•बेकायदा गुटख्याची विक्री जोमात सुरू, कोळशाची हेराफेरी मोठ्या प्रमाणात मग वणी पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय?…
•सट्टा, मटका, आयपीएल हे एकच ध्येय वणी पोलिसांनी लक्ष हाती घेतले काय अशी खमंग चर्चा….
वणी (11 मे ):- चिखलगांव येथील एका ले-आऊट मध्ये सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर काल रात्री वणी पोलिसांनी धाड टाकून क्रिकेट सट्टा घेणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरून वणी पोलिसांनी गून्हा नोंद करीत एकूण 8 लाख 48 हजार 515रुचा मुद्देमाल मिळून आला.


सविस्तर वृत्त,दिनांक १०/०५/२०२२ रोजी मुखचोर कडून माहीती मिळाली वगाव बशी येथे नाम अल नीलोख यांनी किरा याने दिलेल्या रुममध्ये IPL सन २०२२ मध्ये सुरु असलेल्या टि २०-२० क्रीकेट बेटिंग लखनउ वि गुजरात टिममध्ये १० मे २०२२ रोजी सुरू असलेल्या सामन्यावर मोबाईलद्वारे क्रीकेट बेटींग हा जुगार खेळ व खेळवित आहे अशी माहीती विश्वसनीय कडून देण्यात आली.त्यावरून ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांचे आदेशान्वये अवैध क्रिकेट सटटा जुगार कारवाई करण्याकरीता वणी शहर परीसरात ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी पोउपनि प्रविण हिरे, पोना दिपक, पोशि विशाल, पोशि अनिल, पोशि शंकर हे सर्व

चिखलगाव येथील अब्दुल वहीद शेख खुराणा लेआउटचा घरासमोर गेलो असता त्यांचे घराचे दरवाजे आतुन बंद दिसले . पोस्टॉफ चे मदतीने आत पाहीले असता सदर ठिकाणी काही इसम मोबाईल क्रिकेट बेटींग सटटा जुगार खेळ खेळताना दिसून आले या वरून पोलिसांनी आतमधे प्रवेश केला असता, सदर ठिकाणी आरोपींमध्ये संदीप नारायण देवगडे (३४) रा. चिखलगांव, सौरभ राजेंद्र मिश्रा (२८) रा. वरोरा, शिवदास संभाजी तडस रा. वरोरा, अब्दुल छनील अब्दुल वाहिद शेख (३५) रा. सुराणा ले-आऊट वणी यांचा समावेश असून त्यांच्यावर मजुका च्या कलम ४,५ व सहकलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पंचासमक्ष सदर इसमांची झडती घेतली असता त्यांचाजवळ नगदी ८८,००० रुपये मोबाईल, एक चारचाकी वाहन, एक दुचाकी वाहन उतारी केलेल्या चिठया इतर असा एकूण 8 लाख 48 हजार 515रुचा मुद्देमाल मिळून आला. वरून सदर इसमांना मालासह ताब्यात घेवून वणी पोस्टेला गुन्हा नोंद करण्यात आला.
वणी पोलिसांचे आवाहन……..
“१. सर्व नागरीकांना आवाहन अवैध व्यावसायीक जसे मटका जुगार सटटा इत्यादी धंद्याचे ठिकणी वारंवार कार्य होत असल्याने सदर अवैध धंदे करणारे इसम हे त्यांची जागा बदलवून आपले अवैध धंधा चालविण्याकरीता जागा बदलाने घर/ दुकान/बल्डींग/गेत असे घेवून तेथून अवैध व्यवसाय करतात. अश्या ठिकाणावर पोलीसांकडून रेड कारवाई झाल्यास संबंधीत दुकान/शेत/ बिल्डिंग देणारे मालक यांना सुध्दा सह आरोपी बनविण्यात येईल याची नोंद घ्यावे
२. नागरीकांनी आपले दुकान खाली भाडयाने देतांना ते घेणा-याचे काही गुन्हेगारी स्वरूपाचे आढळून आल्यास पोकीसांसोबत संपर्क साधून माहीती तपासावी
३. सामान्य जनतेस वणी पोलीसांकडून आवाहन करण्यात येते की, असे अवैध व्यावसायीक आपले परशेजारी चौकात दुकानात खाली बिल्डींग, शेतामध्ये किंवा इतरत्र कोठेही आढळून आल्यास तात्काळ पोलीसांना माहीती द्यावी जेणेकरून अवैध धद्यांवर प्रभावी कारवाई करणे पोलीसांना सोपे होईल तसेच सदर माहीती देणारे नागरीक यांचे नाव गुपीत ठेवण्यात येईल.”
सदरची कारवाई डॉ.दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधिक्षक यवतमाळ ,धरणे अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार रामकृष्ण महल्ले, पोउपनि प्रविण हिरे, पोना दिपक,पोशी विशाल गेडाम, पोशि अनिल ,पोशि शंकर चौधरी यांनी केली. पुढील तपास सपोनि चाटसे व पोउपनि प्रवीण हिरे करीत आहे.




