नगरपरिषद गडचिरोली येथे भोंगळ कारभार , सत्ताधाऱ्यांचा समन्वय नसल्याने वार्डातील जनतेची गैरसोय.
नगरपरिषद गडचिरोली येथे भोंगळ कारभार , सत्ताधाऱ्यांचा समन्वय नसल्याने वार्डातील जनतेची गैरसोय.
रुचित वांढरे यांचा आरोप..
विदर्भ 24 न्यूज..
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली :–नगरपरिषद येथे गेल्या 3 वर्षा पासून सातत्याने होत असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे जनतेचे व शहराचे बेहाल होत असल्याचा आरोप रुचित वांढरे यांनी केला आहे. स्थानिक नगर परिषदेच्या मागील निवडणुकीत जनतेने भाजपाला एकहाती सत्ता मोठ्या विश्वासाने व अपेक्षेने दिली होती . परंतु नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान भाजप उमेदवारांनी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण न होता उलट होत असलेली कामे सुद्धा ठप्प पडले असल्याचे दिसून येत असून नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यात समन्वय नाही तसेच नागरिकांसोबत संपर्क नाही . गडचिरोली शहरातील अनेक वार्डातील नागरिकांनी 3 वर्षात नगरसेवक कोण आहे ते पाहिलाच नाही असेही वांढरे यांनी म्हटले आहे. शहरामध्ये नाली स्वछता किमान महिन्यातुन चारदा करणे गरजेचे आहे. परंतु हे होताना दिसत नाही. पाणी पुरवठा बहुतांश ठिकाणी ठप्प आहे तर काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या नियोजना अभावी केवळ 15 मिनिटे पाणी येत आहे तर 5मिनिटे हवा येत असते तर कचरा गाडी देखील महिन्यातुन केवळ दोनदा वॉर्डा मध्ये दिसत आहे . या व्यतिरिक्त नुकताच गट्टर पाईप लाईन चे काम शहरामध्ये करण्यात आले असून कित्येक बांधकाम झालेले नवेनवे रोड देखील फोडण्यात आले. यामुळे येत्या पावसाळ्या मध्ये रस्त्यांवर चिखल साचणार आहे. अंतर्गत वादामुळे अनेक प्रश्नांचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला असून कोणत्याही कामाचे गांभीर्य नसल्याचे रुचित वांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे .



