वणी येथे राष्ट्रीय लोकअदालत मध्ये २३४ प्रकरणांचा निपटारा..
•एकूण रक्कम ४१ लाख ५१ हजार ७७७ रू वसुल
वणी( 10 मे ) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार ०७ मे २०२२ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय वणी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. 

ज्यामध्ये दोन पॅनल मंडळ ठेवले असुन पहिल्या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख म्हणून के. के. चाफले, दिवाणी न्यायाधीश, व सदस्य म्हणून अॅड. एस. पी. व-हाटे व अॅड. आर. डी. तेलंग होच्या, तसेच दुस-या पॅनलमध्ये पॅनल प्रमुख म्हणून एस. एम. बोमीडवार, सह- दिवाणी न्यायाधीश, व सदस्य म्हणून अॅड. ए. टी. सिडाम व अॅड. व्ही. एम. मांडवकर होते. त्यासह विशेष न्यायालय म्हणुन पी.सी. बछले सह-दिवाणी न्यायाधीश यांनी कामकाज बघितले.
या लोकन्यायलयात मोटार वाहन कायदा अंतर्गततची प्रकरणे निगोशिएबल इन्टुमेंट अॅक्ट कायद्या अंतर्गतची प्रकरणे बँक व फायनान्स कंपनीचे वसुली प्रकरणे, भुसंपादन प्रकरणासह शेतजमिनी विषयक प्रकरणे, कर भरणा, वीज बिल पाणी बील प्रकरणासह फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, वैवाहित व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश होता.

सदर लोकन्यायालयात एकुण २३४ दिवाणी व फौजदारी दाखल प्रकरणे समझौत्याने मिटली व त्यामध्ये एकुण रक्कम रु.४१लाख ५१ हजार ७७७ रू- एवढया रकमेची तडजोड झाली. विशेष न्यायालयाने एकुण ११२ दाखल प्रकरणे निकाली काढण्यात आली असुन एकुण रक्कम रुपये ३४,०००/- एवढा दंड वसुल करण्यात आला. 
सदर लोकअदालत व विशेष न्यायालय यशस्वी होण्यास सहा अधिक्षक देशमुख यांचेसह तालुका विधी सेवा समितीचे वरीष्ठ लिपीक जुमनाके, कनिष्ठ लिपीक निमकर व शिपाई महेश आगरे व इतर न्यायालयीन कर्मचा-यांनी उत्सफुर्त सहभाग होता.
त्यासह वकील संघटनेचे मान्यवर वकीलांनी मोलाचे सहकार्य केले व लोकअदालत यशस्वी होण्यास पो .स्टे. वणी येथील पी .आय रामकृष्ण महल्ले, पो. हे .कॉ कुंटावार , वाहतूक शाखेचे स. पो .नि आत्राम सा .पो. कॉ संदीप मंडाले, पो .स्टे शिरपूर येथील पी. आय. गजानन करेवाड, ए .एस .आय स्वामी हे सर्व हजर होते.



