अखेर…. विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट यांचा मृतदेहच आढळला…..
•काही घात पात तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र सुरू
•घरातून निघून जाण्याचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात.
मारेगाव ९ मे :- वणी शहरातील सुभाषचंद्र बोस चौक येथे वास्तव्यास असलेल्या विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट ( वय ६६) याचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. दि.७ मे रोज शनिवारी दुपारी राहत्या घरी कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्यांचा मुलगा शरद विजय हेपट यांनी काल दिनांक ८ मे ला वणी पोलीस स्टेशमध्ये रितसर बेपत्ता असल्याची नोंद केली होती. यानंतर आज दिनांक ९ मे ला त्यांचा मृतदेहच वेगाव शिवारात गळफास स्थितीत सकाळी ९ वाजता आढळून आला.
बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह संशसास्पद अवस्थेत मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बडू हेपट त्या वेगाव शिवारात कसे आले व कशासाठी आले. काही घात पात तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.