महाराष्ट्रातील वाजंत्री आणि बँड वाजवणाऱ्या समाजातील कुटूंबाना आर्थिक सहाय्य मंजूर करा..
महाराष्ट्रातील वाजंत्री आणि बँड वाजवणाऱ्या समाजातील कुटूंबाना आर्थिक सहाय्य मंजूर करा..
= अखिल भारतीय मादगी समाज संघटना शाखा चामोर्शी चे मुख्यमंत्र्यांना निवेदन =
विदर्भ 24न्यूज़
जिल्हा प्रतिनिधि/चामोर्शी:– संपूर्ण भारतात सध्या कोरोना (कोवीड-19)च्या काळात महाराष्ट्रातील,मादगी,मातंग तसेच तत्सम व्यवसाय करणाऱ्या जातीची परिस्थिती अत्यंत भिषण व हालाखीची झालेली आहे. मार्च ते जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे, लग्न समारंभ होत असतात. परंतु कोरोना प्रसंग लक्षात घेत सरकारनी या सर्व समारंभावर बंदी घातली आहे. परिणामी वाजंत्री व बँड वाजवून चार पैसे कमावणारा हा वर्ग पूर्णपणे निरुद्योगी झालेला दिसत असून आर्थिक टंचाईला सामोरे जात आहे. आज घडीला मय्यताला सुध्दा कोणी बोलवायला तयार नाहीत. या समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच जास्त प्रमाणात अवलंबून असतो, परंतु आज रिकाम्या हाताला काम नसल्याने मादगी समाजाच्या घरी उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मादगी समाजाच्या उत्थानाकरीता अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, संकटकाळी या समाजाला मदत करणेच हा या महामंडळाचा मुख्य हेतु असुन या बिकट परिस्थितीत तरी या महामंडळाच्या माध्यमातून समाजाला आर्थिक मदत मीळणे अपेक्षित आहे. फिजीकल डिस्टंन्सींग मुळे काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मादगी समाज तसेच तत्सम समाजाला अनुदान मंजूर करा अशी मागणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
भविष्यात प्रत्येक कुटूंब स्वतःच्या पायावर उभे झाले पाहिजे, यासाठी व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विद्यमान सरकारने अनेक महत्वाचे व समाजाभिमुख निर्णय घेतलेले असल्याने आत्ताच्या परिस्थितीत तातडीने प्रती कुटूंब 5000 रूपये पर्यंतची मदत अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुध्दा या निवेदनातुन करण्यात आली आहे.दिनांक 10/06/2020 रोजी मा. तहसीलदार, तहसील कार्यालय, चामोर्शी तहसीलदारामार्फतीने मा.ना.श्री. उध्दवरावजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. मोहनभाऊ देवतळे प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले असून याप्रसंगी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष मा.अविनाश तोटपल्लीवार,योगेश केस्तावडे, तालुका संघटक, रोहीदास केस्तावडे पदाधिकारी व समाजबांधव तालुका पदाधिकारी उपस्थित होते.



