धोपटाळा शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा…..
धोपटाळा शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा…..
वणी (3.मे ):- दिनांक 1 में 20224 रोजी जि. प. प्राथमिक शाळा घोपटाळा चिखलगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षा संजीवनी पिंपळकर प्रमुख पाहुणे माधुरी महाकुलकर (उपाध्यक्ष), मारोती बोढाले(ग्रा.प. सदस्य), बंडू गेडाम, दुर्गा गेडाम पुजा महाकुलकर, अर्चना घोसरे , कवडू मडावी (सदस्य) ते उपस्थित होते. तसेच विवेकानंद विद्यालयले शिक्षक ढवस व गेडाम सुद्धा उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा हस्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक हरडे यांनी केले. निपुण भारत उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचन व कविता गायन केले. इयत्तावार वार्षिक निकाल घोषीत करण्यात आला.
मारोची बोढाले (ग्रा.प.सदस्य) यांनी विद्यार्थाना पुढील वर्षाकरिता शुभेच्छापर मोलाचे मार्गदर्शन केले.
तर संजीवनी पिंपळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षणाचे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश तालावार यांनी केले तसेच गावचे पोलीस पाटील बबनरावजी देठे व गावकरी उपस्थित होते.



