भरधाव ट्रकची दुचाकी वाहन चालकास धडक, स्टूडंट कॉम्प्युटर समोरील घटना

- सावली- आज सकाळी अकरा वाजता स्टूडंट कॉम्प्युटर समोर भरधाव ट्रकने दुचाकी चालकास धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. योगेश जेंगठे (32वर्षे)असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून तो गडचिरोली जिल्हतील इंदाळा येथिल रहिवासी होता,
घटनेच्या दिवशी जखमी दुचाकीस्वार कामानिमित्त इंदाळ्यावरून सावली कडे आपल्या नव्या स्प्लेडर ने येत असतांना त्यांच दिशेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चा काही भाग दुचाकीस्वाराच्या गाडीला घासून गेल्याने दुचाकी स्वरांच्या उजवा पाययाचे दोन तुकडे होऊन घटनास्थळी दुचाकीस्वार खाली कोसळला सोबतच नव्या स्प्लेडर दुचाकीचीही नुकसान झाली सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी धावून आले जखमी ला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असतानांही भरधाव क्षमतेपेक्षा अधिक साहित्य भरून अनेक मोठी वाहने भरधाव वेगाने जात असल्याने पायदळ आणि दुचाकी स्वारांना येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे आपला जीव मुठीत ठेऊन प्रवाशांना आपला मार्ग निश्चित करावा लागत आहे त्यातूनच हा प्रकार घडला असून तरुण युवकाला आपला पाय गमवावा लागला आणि गंभीररित्या जखमी व्हावे लागले भविष्यात सदर चा मार्ग हा मोठ्या अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असल्याने कामाच्या धडाक्यात भरधाव येणाऱ्या वाहनावर पोलिस विभाकडून योग्य कारवाही करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे,