मारेगाव येथे मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टी
•एकविरा महिला पतसंस्था व सन्मान स्त्री शक्ती फाऊडेशनचा उपक्रम
मारेगाव( 1. मे ):- एकविरा महिला पतसंस्था व सन्मान स्त्री शक्ती फाऊडेशन मारेगावच्या संयुक्त विधमाने 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता येथील एकवीरा पतसंस्थेच्या प्रांगणात मुस्लिम महिलांसाठी इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला.
मुस्लिम समाजातील पवित्र असलेला रमजान महिन्यात मुस्लिम बांधव व महिला या महिन्यात महिनाभर उपवास, (रोजे) ठेवीत असतात. पहाटे सैरी करून दिवसभर पाणी किंवा काही सुद्धा तोंडात न खाता उपवास ठेवीत असतात व सायंकाळी उपवास सोडताना त्याला (इफ्तार) म्हणतात. या इफ्ताररीला मुस्लिम पुरुष,महिला सायंकाळी उपवास इफ्तार करून उपवास सोडत असतात मारेगाव शहरात प्रथमच महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन 
सन्मान स्त्री शक्ती फाऊडेशन व एकवीरा महीला पतसंस्था मारेगावच्या अध्यक्षा किरण देरकर व सचिव माधुरी नगराळे यांच्या इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुस्लिम महिला उपस्थित होत्या.यावेळी आलीमा मुस्कान शरीफ यांनी रमजान या पवित्र महिन्यातील इफ्तार सैरी वर प्रकाश टाकत उपस्थिताना मार्गदर्शन केले व नात शरीफ ,प्रार्थना प्रवचन, करून आपला उपास रोजा इफ्तार फळाच्या माध्यमातून केला त्यानंतर मंचकावर उपस्थित असलेले महिला मान्यवरांच्या हस्ते मुस्लिम महिलांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर मुस्लिम महिलांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. मारेगाव शहरांमध्ये प्रथमच मुस्लिम महिलांसाठी एक जगा वेगळे सदिच्छा भेट म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन किरण देरकर, माधुरी नगराळे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
मुस्लिम महिलासाठी हितगुज व मिलन मेळावा इफ्तार पार्टी च्या माध्यमातून करण्यात आला यावेळी मारेगाव शहरांतील मुस्लिम समाजाच्या महिलांमध्ये नगरसेविका अंजुम शेख , ऍड. हुमेरा अली, राखिया शेख, खैरून निशा, मुमताज शेख, रिजवाना शेख, शगुफ्ता शेख, शम्मा शेख, असंख्य मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एकवीरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर,सचिव माधुरी नगराळे ,जिजाबाई वरारकर , सुरेखा भेले, मंगला आसेकर , रंजना येरगुडे आदींनी परिश्रम घेतले.




