पोलिस उपनिरीक्षक आणि हवालदार एसीबीच्या जाळ्यात,५० हजारांची स्वीकारली लाच,पोटेगाव पोलीस मदत केंद्रातील घटना,

पोलिस उपनिरीक्षक आणि हवालदार एसीबीच्या जाळ्यात,५० हजारांची स्वीकारली लाच,पोटेगाव पोलीस मदत केंद्रातील घटना,
विदर्भ 24 न्यूज..
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली : गुन्ह्यात आरोपी करून अटक न करण्यासाठी ७० हजारांच्या ला. प्र. वि. लाचेची मागणी करून ५० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पोटेगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत . शिवराज माणिकराव कदम ( ३६ ) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे तर मंगलदास सीताराम कुलसंगे ( ५० ) असे हवालदाराचे नाव आहे . तक्रारकर्ता गिलगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर १७३/२०२० च्या गुन्ह्यात आरोपी करून अटक न करण्यासाठी ७० हजारांची लाच मागितली होती . याबाबत त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली कडे तक्रार दाखल केली होती . ५ जून रोजी पडताळणी करून एसीबीने सापळा कारवाई राबविली . यानंतर तडजोडीअंती ५० हजारांची लाच स्वीकारल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर , अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुधलवार , लाप्रवि गडचिरोलीचे पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरुड यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवि राजूलवार , मोरेश्वर लाकडे , पोहवा नत्थु धोटे , पोना. सतीश कत्तीवार , देवेंद्र लोणबले , पोशी . किशोर ठाकुर , पोशि गणेश वासेकर , पोशि महेश कुकुडकार , चापोशि तुळशीराम नवघरे यांनी केली आहे .