वणी येथे काँग्रेसचे “महागाई जुमला” आंदोलन
•केंद्र सरकारविरोधात आंदोलकांनी केली जोरदार घोषणाबाजी
वणी ( 27एप्रिल):- काँग्रेसच्या वणी तालुका व शहर कमिटी यांच्या वतीने मंगळवार (ता. २६) वणी शहरातील पेट्रोल पंप जवळ महागाई जुमला आंदोलन करण्यात आले. निवडणूक काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना इंधन दरवाढीवरून लोकांना आश्वस्त केले होते.. मात्र आश्वासन केवळ हवेत राहिल्याने काँग्रेसकडून सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, केंद्र सरकारचा निषेध केला.


पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलचे दर वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे सतत वाढत आहेत. केंद्र सरकारने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.

आंदोलन माजी आमदार वामन कासावार यांच्या मार्गदनाखाली करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष देविदास काळे , यवतमाळ जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विवेक मांडवकार, पुरुषोत्तम आवारी,उत्तम गेडाम, डॉ. पावडे, राजा पाथ्रडकर, सुनिल वरारकर, वणी तालुका अध्यक्ष, प्रमोद वासेकर, वणी शहर प्रमुख प्रमोद निकुरे, रफीक रंगरेज, विकेश पानघाटे, वणी तालुका महीला काँग्रेस अध्यक्षा संध्या बोबडे,वंदना धगडी, वंदना आवारी, काजल शेख व काँग्रेसचे कार्यकर्त, तालुका, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी उपस्थित होते.
या



