Vidarbh24News

Latest Online Breaking News

मोठया व खाजगी वाहनांची अडगळीत पार्किंग – ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता

•शहरात वाहतुकीची कोंडी कायमच

•वाहतूक पोलिसांची मोठया प्रमाणात पठाणी वसुली सुरू – अशी खमंग चर्चा

वणी (27 एप्रिल) :- शहरात जातांना चिखलगाव- लालपुलिया परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांना भेडसावणाऱ्या वाहतुकीची कोंडी या समस्येचे निराकरण होणार असे वाटत असतानाच शहरात वाहतूक पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे मोठया वाहनांची अडगळीत पार्किंग व ओवरलोड वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन अपघाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

स्थानिक शहराची व आजूबाजूने मुख्य रस्त्यापासून ते बस स्थानक परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होताना निदर्शनास येते. सदर समस्या ही गेल्या वर्षानुवर्षांपासून रेंगाळत होती. मात्र स्थानिक बस स्थानक परिसरात बाजारपेठेतील अनेक प्रतिष्ठान समोर तसेच मुख्य मार्गावर चिखलगाव – लाळपुलिया ते बस स्थानक परिसरात अधिकृत वाहनतळ नसतानाही आणि खाजगी व मोठे वाहन रस्त्यावर उभी केलं जात असल्याचे चित्र निदर्शनास येते. अशातच शहरातून जाणाऱ्या ओवरलोड रेतीची वाहने, तसेच गणित साहित्य वाहून येणारी सुरजागड प्रकल्पाची शेकडो वाहने, व इतर जड वाहने अशा भरपूर प्रमाणात वाहनांच्या वर्दळीमुळे शहरातील सदर प्रमुख मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.

या परिसरात (मेन चौकातच/टिळक चौकात)स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत वाहतूक पोलीस नियुक्त केले असले तरी वाहतूक नियंत्रक पोलीस (वसुली) हे कर्तव्यावर न राहता केवळ वसुलीसाठी शहराबाहेरील जंगल परिसरात वाहने थांबून वाहन धारकांची आर्थिक पिळवणूक करत दिलेली जबाबदारीपासून झटकत असल्याचे नागरिकांकडून  बोलल्या जात आहे.

सदर मार्गावर अनेक मोठे अपघात घडले आहेत. याच मार्गावरून विद्यार्थी तथा ग्रामीण आबालवृद्ध मार्गक्रमण करीत असून शहरातून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर वाहतूक नियंत्रक पोलिस (वसुली) यांचे खाजगी वाहन धारकांची असलेले सलोख्याचे व साटेलोटे याचे संबंध यामुळे खाजगी ऑटो व  मोठया वाहनधारकांवर कारवाई करण्याऐवजी किरकोळ दुचाकी वाहनधारकांवर व अतिक्रमण करून असलेल्या गरिबांवर कारवाईचा बडगा उगारून केवळ कर्तव्य दक्षता चा टेंभा मिरवणा-या इतपत मजल मारून शहरातील नागरिकांच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने वणी ठाणेदारांनी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी या वसुली करण्याऱ्या वाहतूक पोलिसाची तात्काळ उचलबांगडी करून नवीन वाहतूक नियंत्रण प्रमुखाची नेमणूक करावी शहरात चर्चा जोर धरत आहे.

 

कोड:- 

“शहरात वाहतुकीची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मात्र  खाजगी वाहन व चिखलगाव – लालपुलिया परीसरात ओव्हरलोड कोळसा धारकांची वाढती मनोपली व शहरातून होणारी प्रचंड ओव्हरलोड वाहतूक यावर वाहतूक पोलिसाचे अंकुश नसून शहरातून होणाऱ्या वाहतुकीवर त्वरित निर्माण झाला धारकास मोठे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” – संध्या रामगिरवार (शिवशाही कार्यकारिणी, अध्यक्ष)

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!