अजय गोवर्धन पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू….
दुःखदायक वार्ता….
•राजूर गावात शोकाकुल वातावरण…
वणी (26 एप्रिल):- राजूर येथील रहिवासी तसेच हल्ली मुक्कामी म्हणुन राहत असलेले अजय गोवर्धन पाटील वय (42 वर्ष)यांचे दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले
.

राजूर व मारेगावसह परिसरात सुपरिचित व सर्वांसोबत हसत खेळत राहणारे असे वेगळे व्यक्तिमत्व छाप सोडणारे व प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे अजय गोवर्धन पाटील (वय 42)यांचे आज रात्री. 8.00 वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला .हा झटका इतका तीव्र होता की त्यात त्यांचे दुःखद निधन झाले.

त्यांचे मागे 2 मुली, पत्नी नातवंड व बराच मोठा आप्त परिवार असुन राजुर येथील राहत्या गावी सकाळी 11 वाजता राजूर मोक्षधाम येथे त्यांचा पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



