आबड भवन येथे भिषण आग, अंदाजे कोट्यवधीचे नुकसान
•लगतच असलेले रत्नंम फर्निचरचे प्रतिष्ठान काही वेळातच जळुन खाक
वणी (24 एप्रील) :- शहरातील टागोर चौकातील परिसरात असलेलल्या आबड भवनला अचानक आग लागल्याने अंदाजे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

शहरातील आबळ भवन असलेला परिसर हा मोठा म्हणून विशेष ओळख आहे.याचा बाजूलाच वणीतील मोठ मोठे प्रतिष्टीत दुकाने देखील आहे.आज दिनांक 24 एप्रिलला दुपारी 3 वाजताच्या सुमार परिसरातील आबड भवन येथे भिषण आग लागली. या आगीने काही वेळातच रूद्ररूप धारण केले त्यात आजु-बाजुचा परिसर सुध्दा आगीत भस्म झाले.
यामध्ये आबड भवन जवळ लागुन असलेले रत्नंम फर्निचरचे प्रतिष्ठान काही वेळातच जळुन ,खाक झाले . त्यात टीव्ही , लाकडी अनेक वस्तू तेथीलच अग्निशमनदलाला त्वरीत बोलावले असुन अग्निशमन दल व कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य करीत आहे.

ही आग एव्हढी मोठी होती की,2 अग्निशामक गाडी देखील कमी पडले. म्हणुन rescue team बाहेरून बोलावण्यात आले अशी माहिती मिळाली. परंतु ही आग सर्वात मोठी लागलेली आग म्हणुन शहरात चर्चा आहे.आग का व कशी लागली याचे कारण अद्यापही कळु शकले नसुन, अग्निशमन दलाचे आग वाजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. वृत्त लिहीतपर्यंत एवढीच माहिती कळू शकली.



