मारेगाव सोसायटीवर परिवर्तनाची लाट….

●अखेर संजय देरकर,गौरीशंकर खुराणा पॅनलचा दणदणीत विजय…
मारेगाव (18 एप्रिल) :- गेल्या चाळीस वर्षा पासुन एक हाती सत्ता असलेल्या मारेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर यंदा परिवर्तनाची लाट आली.आज झालेल्या निवडणुकीत संजय देरकर,गौरीशंकर खुराणा गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनलच्या तेराही उमेदवाराचा बहुमताने दणदणीत विजय झाला.
जवळपास 15 गावांचा समावेश असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठी, करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या मारेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 13 प्रतिनिधीची आज 17 एप्रिल रोजी येथील जिल्हा परिषद शाळेत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात 1475 सभासद मतदारा पैकी 1103 सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
या सोसटीवर जवळपास गेल्या चाळीस वर्षा पासुन नरेंद्र पाटील ठाकरे गटाच्या पॅनलचे वर्चस्व होते.मात्र यावेळी मारेगाव सोसायटीवर परिवर्तनाची लाट आली.व अखेर गेल्या चाळीस वर्षा पासून मारेगाव सोसायटीवर चालत असलेले शेतकरी विकास पॅनल चे ट्रक अखेर फेल पडले.व संजय देरकर व गौरीशंकर खुराणा गटाच्या शेतकरी परिवर्तन पॅनल चे हेलिकॉप्टर अखेर मारेगाव सोसायटीवर बसले.
यात महिला राखीव प्रतिनिधी उमेदवार म्हणून सौ.सुनीता तुळशीराम मस्की,सौ.मनीषा मारोती टोंगे तसेच इतर मागास प्रवर्गात काशिनाथ शामराव खडसे, भ.जा.ज/वि.मा.प्रावर्गातून प्रवीण अशोक बरडे, अनु.जाती/जमाती प्रवर्गातून दामोदर लक्ष्मण किनाके तर सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातील प्रतिनिधी उमेदवार प्रवीण साईबाबा बोबडे,दिवाकर महादेव डुकरे,सुनील पतिराम गायकवाड, गजानन पाडुरंग घोटेकर,गजानन मारोतराव किन्हेकर,रवींद्र वसंतराव पोटे,चेतन बाबाराव पारखी,प्रवीण कवडू शेंडे या शेतकरी परिवर्तन पॅनल च्या तेराही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.