विरोधाला न जुमानता माझे सामाजिक कार्य सदैव असेच सुरु राहील – विजय चोरडिया (अध्यक्ष)
●बदनामीचा कट रचणारे ते व्यक्ती कोण ?
●एका मंदीरात समितीत एकच अध्यक्ष असतो दोन दोन अध्यक्ष नसतात हे सर्वसामान्य जनतेला समजते ,परंतु एखाद्याला कार्य देतांना कार्यभार प्रमुख म्हणून निवड केल्या जाते अध्यक्ष म्हणून नाही- विजय चोरडिया….
वणी (17 एप्रिल) :– शहरात रामनवमी निमित्त अवघ्या दोन वर्षांनंतर भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहर श्रीराम या नाऱ्याने दुमदुमली.परंतु याच मिरवणूकी दरम्यान भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठित असलेले विजय चोरडिया यांनी त्यांचा घरगुती श्वानाला अत्यंत साध्या पद्धतीचा भगव्या रंगाचा कपडा विशेषतः त्यात कोणत्याही दैव चित्र नसलेला कपडा त्या श्वानाला घालून दिले. त्यात काही विरोधकांना ही बाब खुंपली आणि मोठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाचा माध्यमातून करण्यात आला.याच बाबीची स्वतः 16 एप्रिल रोज शनिवारला विजय चोरडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा देऊन याबाबत दिलगीरी देखील व्यक्त केली.
गेल्या काही दिवसा अगोदर रामनवमी समितीचा अध्यक्षस्थानी विजय चोरडिया यांची सर्वानुमते निवड झाली व अध्यक्ष म्हणून संपूर्ण कमिटीत त्यांची घोषणा देखील झाली.त्या रामनवमीचा उत्सव म्हणून त्यांचा अध्यक्षतेखाली अनेक असे कार्यक्रमाची जोरदार सुरवात त्यांनी केली त्यात विजय चोरडिया यांनी रक्तदान शिबिर, अन्नछत्र, पाणपोई , गरजुंना मदत करीत समाजकार्य करुन, सामाजिक ऐक्य जोपासण्याचा प्रयत्न केला. परंतु काही समाज कंटकामुळे अशी परिस्थिती उद्भवली असे स्पष्ट मत विजय चोरडिया यांनी मांडले.
अवघ्या दोन वर्षांनंतर विजय चोरडिया यांचा रामनवमी समितीच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहर श्रीराम या नाऱ्याने दुमदुमली.परंतु याच मिरवणूकी दरम्यान भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठित असलेले विजय चोरडिया यांनी त्यांचा घरगुती श्वानाला अत्यंत साध्या पद्धतीचा भगव्या रंगाचा कपडा विशेषतः त्यात कोणत्याही दैव चित्र नसलेला कपडा त्या श्वानाला घालून दिले. हीच बाब त्यांचा विरोधकांना खटकली व त्या मिरवणुकीत असलेल्या श्वानाचा व्हिडिओ तयार करून त्याला सोशल मीडियाचा माध्यमातून त्याला वायरल करण्यात आले.माझा नावाचा बदनामीच्या कट रचण्यात आला असा स्पष्ट आरोप विजय चोरडिया यांनी केले.परंतु याबाबतही समाजाचा भावना जर दुखावल्या असेल असे वाटत असेल याबाबत मी दिलगिरी व्यक्त करितो असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत सर्वांन समक्ष त्यांनी दिलेली प्रतिक्रिया
“माझ्या घरी असलेला पाळीव श्वान हा माझ्या परिवारातील एक सदस्य असुन श्वानाला आम्ही खंडोबा मानतो आणि खंडोबा हे हिंदूंचे दैवत आहे. दैवताचे पूजन करणे हि हिंदू संस्कृती आहे. प्रत्येक सणाला जे काही रंगाचे कपडे आम्ही परिधान करतो, त्याच रंगाचे कपडे आम्ही श्वानासाठी तयार करतो. कारण ते श्वान नाहीतर माझ्या परिवारातील सदस्याप्रमाणे असल्यामुळे,त्याला केशरी रंगाचे वस्त्र रामनवमीचा दिवशी देखील परिधान करण्यात आले. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी विजय चोरडिया आपणास दिलगीरी व्यक्त करतो ” – ( विजय चोरडिया – रामनवमी समिती अध्यक्ष,वणी

यावेळी रामनवमी समिती अध्यक्ष विजय चोरडिया,राजाभाऊ बिलोरिया,शाम भडघरे, अजिंक्य शेंडे,उमेश पोद्दारसह मोठ्या संख्येने रामनवमी सदस्य उपस्थित होते.





