राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २१ वा वर्धापन दिन साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले त्यात बहुजन सुखाय स्वयंरोजगार अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमआणि काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
आज दिनांक 10/6/2020 ला सरकारनगर चव्हाण कॉलनी, अग्रवाल कोचिंग क्लास च्या समोर लॉ कॉलेज रोडवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला, काही गरीब लोकांना स्वयं रोजगार करण्याकरिता भाजीपाल्याच्या धंद्याकरिता संदीप निर्गुडवार यांना आणि प्रेस(इस्त्री) धंद्याकरिता रविदास पाटील, राजकला सुरेश भिषे यांना त्यांचा स्वताच्या पायावर उभे राहण्याकरिता पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. या वेळी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, ओबीसी सेल चे जिल्हाअध्यक्ष डी. के. आरीकर, प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, सेवादल अध्यक्ष महादेव पिदूरकर, विधानसभा अध्यक्ष सतीश मिनगुलवार, महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, माजी जिल्हाध्यक्ष युवक सुनील दहेगावकर, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. देव कन्नाके सामाजिक न्याय चे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण भगत, ओबीसी सेलचे शहर जिल्हाअध्यक्ष रवी ठाकरे, कार्याध्यक्ष माणिक लोणकर, महिला अध्यक्ष शुभांगी डोंगरवार, कार्याअध्यक्ष राणी राव, शहर अध्यक्ष नंदा शेरकी, रंजना नागतोडे, अर्चना हेमने, अमृतलाल राठी, महेंद्र शेरकी, प्रज्ञा पाटील, मेघा रामगुंडे, सुनील निकुरे, भगवान वारकर, हा कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेऊन करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र बेलखाडे व त्यांच्या कुटुंबियांचे मोठं योगदान लाभले !



