अचानक तोल गेला अण.. जागीच मृत्यू झाला.
′●वणी येथील शेवाळकर परीसरातील घटना…
वणी (15 एप्रिल):- वणी येथील शेवाळकर परीसरात राहत असलेले 68 वर्षीय वृद्ध इसम 8 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 15 एप्रिल सकाळी 6 चा दरम्यान वाजता खळबळजनक घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की,प्रभाकर पाथ्रटकर वय 68 हे मृतकाचे नाव आहे. प्रभाकर पाथ्रटकर यांनी शेवाळकर परीसरात 8 व्या माळ्यावर सदनिका घेऊन ते परिवारासह राहत होते. १५ एप्रिलला सकाळी ते गॅलरीत उभे असताना अचानक तोल गेला आणि ते खाली कोसळले .प्रभाकर जबरदस्तरित्याखाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
घटनेची वृत्त सकाळी वाऱ्यासारखी पसरली असता अनेकांची गर्दी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. त्यांच्यावर अंतिम संस्कार वणी मोक्षधाम येथे शुक्रवार दिनांक 15 एप्रिलला सायं 5 वाजताचा दरम्यान होईल अशी माहिती मिळाली.








