धोपटाळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत “शाळा पूर्व तयारी मेळावा” उत्साहात संपन्न
वणी ( 14 एप्रिल) :- दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी जि.प. प्राथमिक शाळा घोपटाळा येथे शाळापूर्ण तयारी मेळावा 2022 उत्साहात पार पडली . सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा संजिवनी पिंपळकर उपाध्यक्षा माधुरी महाकुलकर प्रमुख अतिथी म्हणून मारोती बोढाले (ग्रा.प.सदस्या), बंडू गेडाम ,दुर्गा गेडाम, मिरा बोढाले (अंगणवाडी सेविका) हे उपस्थित होते.
शिक्षकवृंदांच्या उपस्थिती घोषणा देत बँड पथकासह प्रभातफेरी काढण्यात आली.नंतर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी स्वयंसेवक प्रियंका महाकुलकर, प्रणाली बोसरे, दुर्गा भोयर, प्रिती भोयर, गजानन देठे, सविता रोडे, अविनाश ,गेडाम, मिरा बोढाले हे उपस्थित होते. दाखलपात्र मुलांकरिता मिरा बोढाले यांनी गीत सादर केले.
मेळाव्यात एकूल सात स्टॉल लावण्यात आले. तीन दखलपात्र मुलीचे पुष्प देऊ स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षक प्रकाश तालावार तर आभार प्रदर्शन मोहन हरडे यांनी केले.मुलांना खाऊ देऊन मेळाव्याची सांगाता करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मोहन हरडे यांनी केले. मारोती बोढाले यांनी मराठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी घडतो असे देखील स्पष्ट मांडले.




