रामनवमी उत्सव समितीच्या वतीने कस्तुरबा हॉस्पिटल्स सेवाग्राम येथे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन.

●शिबिरात ३००रुग्णांची तपासणी करून त्या पैकी १५० रूग्णांना चश्षम्याचे निशुल्क….
वणी (14 एप्रिल ) :- श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्रीविनायक मंगल कार्यालय गणेशपुर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष तारेन्दं बोर्डे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया, राजाभाऊ बिलोरीया,श्याम बडगरे, अजिंक्य शेंडे,अरुण कावडकर, रमेश बिलोरीया, महाविर कटारीया हे उपस्थित होते.या नेत्र चिकित्सा शिबिरात ३००रुग्णांची तपासणी करून त्या पैकी १५० रूग्णांना चश्षम्याचे निशुल्क पाटप करण्यात आले. ९६ रूणांना आय ड्रापचे वाटप करण्यात आले.व उर्वरित ५४ रूग्णांना ऑपरेशन साठी कस्तुरबा हॉस्पिटल्स सेवाग्राम येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.जर कोणत्याही गरजु मोतीबिंदू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करावयाची असेल तर त्यांनी १७ एप्रिल च्या आत रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांच्याशी संपर्क साधावा.
मोफत १७ एप्रिलला सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल्स मध्ये उपचारासाठी दाखल होऊन आपले मोफत ऑपरेशन करून घ्यावे अशे आव्हान समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले आहे.