देव दर्शन आटोपून येतांना काळाने घाला घातला….
●2 महिला ठार तर 5 गंभीर जखमी…
वणी (13 एप्रिल ) :- काल दि १२ एप्रिलला भद्रावती येथिल नाग मंदीरात स्वयंपाकासाठी गेले असता. स्वयंपाक आटोपून व देवदर्शन घेऊन रात्री ९ वाजता दरम्यान डिजायर या चारचाकी वाहनाने वणीकडे येतांना वणी तालुक्यातील वरझडी बंडा येथिल 2 महिला ठार झाल्या असून 7 गंभीर जखमी झाले आहे त्यात वणी येथील वाहन चालकही जखमी झाल्याची भीषण घटना घडली.
दि.१२ एप्रिल ला भद्रावती येथिल नाग मंदीरात स्वयंपाकासाठी गेले होते. स्वयंपाक आटोपून व देवदर्शन घेऊन रात्री ९ वाजता दरम्यान डिजायर या चारचाकी वाहनाने वणीकडे निघाले होते.

दरम्यान वरोरा जवळील नंदोरी फाट्या नजीक त्यांच्या वाहनाला एका अज्ञात भरधाव ट्रक ने कट मारल्याने कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्यात वाहन पलटी झाले.
या अपघातात वरझडी बंडा येथिल चंद्रभागा सुधाकर गौरकार व मनीषा रोगे या दोन महिलांचा मृत्यू झाला असून, भाग्यश्री मनोज रोगे (२६),सावी मनोज रोगे (४), सविता रमेश हरडे (४५)व वणी येथील अनिरुद्ध महादेव तपासे व त्याचे वडील महादेव रामराव तपासे हे देखील जखमी झाल्याचे वृत्त कळाले.
त्यात असलेले नावे क्रमशः आनंद नगर मधील रहिवासी असलेले अनिरुद्ध महादेव तपासे वाहन चालक, महादेव रामराव तपासे ,वरझडी बंडा येथिल चंद्रभागा सुधाकर गौरकार ,सविता रमेश हरडे ,मनिशा रोगे भाग्यश्री मनोज रोगे व सावी मनोज रोगे हे असल्याची माहिती मिळाली आहे.




