नवरगाव येथील मध्यम प्रकल्प धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी
●शासनाने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवून पशुधनाची संरक्षण करा
(वणी 12 एप्रिल) – नवरगाव येथील मध्यम प्रकल्प धरणाचे पाणी निर्गुडा नदीत सोडून नदीकाठावरील गावातील पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हापरिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी तहसीलदार निखिल धुळधळ याना दिले आहे.
वणी तालुक्यातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदी काठावरील गावातील जनावरांना पिण्याच्या पाण्याची भीषण टँचाई निर्माण झाली आहे. नदीचे रूपांतर छोट्या छोट्या डबक्यात झाल्याने त्या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने त्या पाण्याने जनावरांना अनेक आजार होऊन गावकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे कारण शेतीला उपयुक्त बैल व दुधाळ जनावरांची किंमत प्रचंड असल्याने जनावरांचे नुकसान सहन होणार नाही .
तेव्हा नदी काठावरील वागदरा, मंदर, चारगाव, शिरपूर,शेलु, पुरड, नायगाव,पुनवट, कवडशी, सावंगी, चिंचोली, शिवणी,नवेगाव,अशा तेरा गावातील हजारो पशुधनाला ह्या रखरखत्या उन्हात पिण्याचे पाणी पोटभर न मिळाल्यास अनेक जनावरे मृत्यूवमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकीकडे पिण्याला पाणी नाही तापमान सहन करण्यापलीकडे गेले आहे. अशा भयावह परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर हे पशुधनाला वाचविण्याच्या चिंतेत आहे.
तेव्हा शासनाने जलजीवन धोरना नुसार बैल,गाय, बकरी,मैस, याना पिण्याच्या पाण्याचा मूलभूत अधिकार आहे. नाईलाजाने पशुधनाला नदी मधील साचलेल्या डबक्यातील घाण पाणी पिऊन आरोग्याला बळी पडावे लागत आहे तेव्हा पाण्या अभावी पशुधनाचे प्रचंड हाल होत आहे. या सोबतच शेतामध्ये उत्पादन व उदरनिर्वाह साठी पेरलेला मूग, सोयाबीन भाजीपाला, यांचे पाण्या अभावी अतोनात नुकसान होत असून ते पीक आता वाळून जात आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. निर्गुडा नदीची धार पूर्णपणे बंध झाल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची गँभिर समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांनी नवरगाव प्रकल्पाकडे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलेले पाण्याची मागणी निर्गुडा नदीत सोडून नदी लगतच्या गावातील पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून निर्माण झालेली गँभिर समस्या सोडवावी व पशुधनाला जीवनदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी यवतमाळ, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवर, गटविकासाधिकारी , याना देण्यात आले आहे. यावेळी विजय पिदूरकर, दिनकर पावडे, प्रमोद टोंगे, बंडूभाऊ पिदूरकर, गजानन गौरकार उपस्थित होते.





