रेल्वे स्टेशनवरील कोळश्याच्या रॅक व लालपुलीयातील कोलडेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात …
●शासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ…
●प्रदूषणावर स्थानिक प्रशासन मुंग गिळून का?
वणी (12 एप्रिल) :– येथील रेल्वे स्टेशन वर कोळश्याची रॅक असल्याने मोठ्या प्रमाणात कोळश्याची वाहतूक होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे इतकेच नव्हे तर लालपुलिया परिसरात कोळश्याचे डेपो असल्याने तेथे सुद्धा मोठ्या प्रमाणात कोळसा उतरविला जातो त्यामुळे लकोळशाची वाहतूक, उतराई, चाळणी व भराईमुळे मोठ्या प्रमाणात धुळीकणातुन प्रदुषण होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तेव्हा त्वरित प्रदूषणावर आळा घालण्यात यावा या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अजय धोबे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे याना दिले आहे. 
वणी उपविभागात कोळसा खाणी असल्याने त्या खाणीतून निघणारा कोळसा हा ट्रक द्वारे वणी येथील रेल्वे सायडिंगवर व लालपुलीया येथील कोळसा डेपो येथे उतरविण्यात येतो. तो कोळसा खुल्या जागेत उतरविण्यात येतो तसेच ट्रकमध्ये भरला जातो व त्या कोळस्याची चाळणी केली जाते. या प्रक्रियेमुळे परीसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यामुळे पाणी व हवा दुशीत होऊन जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक लोकांना किडणी, श्र्वसनाचे आजार, चर्मरोग, अनेक प्रकारच्या ॲलर्जी सारख्या आजाराला बळी पडावे लागत आहे.
या सर्व गोष्टीचे निरीक्षण-परीक्षण करून दोन्ही जागेवरील कोळस्याचे प्रक्रिया उद्योग शहरा पासून दुर हलविण्यात यावे. किंवा सर्व व्यवस्थापण बंधीस्थ सेडमध्ये करावे जेणेकरून प्रदूषण होणार नाही.जर यावर तोडगा काढला नाही तर स्थानीक जनतेला सोबत घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ११एप्रिल रोजी निवेदनातुन देण्यात आला.
संबधित निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी यवतमाळ, एस आर ओ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर याना पाठविण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, दत्ता डोहे, अॅड. शेखर वराटे, आशिष रिंगोले व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





