श्रीरामाच्या गजराने वणी नगरी दुमदुमली…..
●रॅलीत हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन
●रामभक्तांचा जल्लोष.
वणी (11. एप्रिल) :– शहरातील वनवासी श्री राम मंदिरातून श्री रामनवमी जन्मोत्सव समितीद्वारे शहराच्या मुख्य महामार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मागील दोन वर्षात कोरोना महामारीचे संकट घोंघावत असल्याने रामनवमी उत्सव साजरी होऊ शकली नाही . यावर्षी कोरोनाचे संकट कमीप्रमाणात असल्याने व शासनाच्या निर्बंधांचे पालन करून श्रीरामाचा घोषात व रामभक्ताच्या जल्लोषात वणी नगरी दुमदुमली. 
वणी शहरात सकाळ पासूनच राम भक्तांची रेलचेल दिसून येत होती. श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती द्वारे आकर्षक प्रवेश द्वार तयार केले .तसेच संपूर्ण शहर भगव्या तोरणाने माखलेले दिसून आले .सायंकाळी 6.30 वाजता श्रीरामाची पूजा करून भव्य दिव्य शोभयात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील गणमान्य व्यक्तींचा सहभाग दिसून आला.
यावेळी श्रीरामाच्या विविध झाकीने वणीकर आकर्षित झाले होते यामध्ये पालखी, घोडे रथ, भजन आकर्षक रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी व या रॅलीचे स्वागत करण्याकरिता प्रत्येक चौकाचौकात नेत्रदीपक रांगोळी काढण्यात आली. या शोभा यात्रेमध्ये महिला पुरुष व बालगोपालांचा तसेच आबालवृद्धांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी वणीचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी चौकाचौकात तगडा बंदोबस्त ठेवला होता. 
या शोभयात्रेच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेऊन ठाणेदार व एसडीपीओ यांचा सत्कार करण्यात आला. श्रीराम भक्तांचे स्वागत करीत शहरातील हिंदू -मुस्लिम समाजातील जातीय सलोखा कायम ठेवीत एकतेचे दर्शन दिसून आले. श्रीराम भक्तांनी रामनवमी जल्लोषात साजरी केली.




