Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणीच्या 170 ते 180 वर्षाच्या ऐतिहासिक बैल बाजाराची परंपरा मोडकळीस……..

 

●यात्रा मैदानावर स्वतंत्र ऐतिहासिक बैल बाजार..

●जागेची पावती नाही ,कुठलीच सुविधा नाही

 वणी (10 एप्रिल) :-  वणीच्या रंगनाथ स्वामी यात्रेत ऐतिहासिक जंगी बैल बाजार भरत असे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महाभयंकर महामारीमुळे यात्रा भरलीच नाही परंतु याहीवर्षी सुद्धा कोरोनाचे सावट असल्याने शासनाने कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करायचे असल्याने बैल बाजाराला परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे यावर्षी यात्रा मैदानावर शेतकऱ्यांनी स्वतंत्र ऐतिहासिक बैल बाजार भरविला आहे.       मागील दोनवर्षापासून शेतकऱ्यांच्या बैलांची अदला बदल होऊ न शकल्यामुळे यावर्षी स्वतंत्र असा बैल बाजार भरवून बैलांची खरेदी विक्री होऊ लागली आहे. परंतु यावर्षी कृषी उत्पन्न बाजारकडून कुठल्याही प्रकारची व्यवस्था देण्यात आली नसून बैलांच्या व्यवहाराची पावती ,तसेच जागेचा कर सुद्धा घेतला जात नाही आहे असे येथील बैल बाजारात आलेल्या बैल विक्रेत्या शेतकऱ्याने सांगितले .स्वतंत्र अशा बैल बाजारात आम्ही स्वतःची व्यवस्था स्वतः करत असल्याने कुठल्याही प्रकारची पावती आम्ही देत नाही असे विदर्भ 24 न्यूज वणी प्रतिनिधीला सांगितले .  जंगी भरणाऱ्या बैल बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांवर  सततच्या संकटामुळे  बैल बाजारावर परिणाम दिसून येत आहे  त्यामुळे ऐतिहासिक बैल बाजार मोडकळीस येण्याचे चिन्ह दिसून येत आहे.  कारण बैल बाजारात दिवसेंदिवस पाण्याची टँचाई, सुविधांचा अभाव, पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने वणीच्या रंगनाथ स्वामी यात्रेच्या 170 ते 180 वर्षाच्या ऐतिहासिक बैल बाजाराची परंपरा मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे.      कारण वणीच्या वैभवातील ही यात्रा व या  यात्रेतील बैल बाजाराला उतरती कळा दिसून येत आहे पूर्वी या बाजारात हरियाणा, राजस्थान, पंजाब, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश कर्नाटक,व महाराष्ट्रातील खेडे गावातील नामवंत बैलांची आवक असायची व शेतकरी अदला बादलीत नवीन जोडी विकत घेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या बैल बाजारात होत असे परंतु आज सतत आलेल्या संकटामुळे इथला शेतकरी हतबल झाला आहे. आज बैल बाजारात बैलांची किंमत 50 हजारांपासून तर अडीच लाखापर्यंत खरेदी विक्री होत आहे .परंतु यावर्षी कोरोना महामारीचे संकट ओसरल्याचे असल्याने शेतकऱ्यांनी रंगनाथ स्वामीं यात्रेच्या निमित्ताने स्वतंत्र यात्रा मैदानावर स्वतंत्र बैल बाजार भरविला असल्याचे दिसून येत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!