सिंदेवाहीत झाले इस्रो चे पथक दाखल
सिंदेवाहीत झाले इस्रो चे पथक दाखल
सिंदेवाही तालुक्यात दिनांक 2 फेब्रुवारी २०२२ ला पहिले सँटेलाईट चे गोल तबकडी स्वरूपाचे अवशेष लाडबोरी येथे पडले त्या नंतर पाठोपाठ लगेच मरेगाव गुंजेवाही व तालुक्यातील इतर परिसरात सिलेंडर च्या प्रकारचे अवशेष आढळून आले. सदर अवशेष सिंदेवाही येतील पोलीस स्टेशन सिंदेवाही मध्ये ठेवण्यात आले होते. जनसामान्यात एक कुतूहल निर्माण होऊन त्या अवशेषांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी प्रचंड प्रमाणात उमडली होती. पन प्रश्न मात्र एकच हे सर्व अवशेष कशाचे कुणी म्हणायचे कि हे अवशेष विमानाचे कुणी म्हणायचे कि हे अवशेष हेलीकॉप्टर चे तर कुणी सँटेलाईटचे पण अद्याप कुनालाही काही स्पष्ठ होत नव्हते. त्या संबंधाने आज विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) मधुन एक पथक आले. व त्यांनी सबंध अवशेषांची पाहणी केली. व ते अवशेष ज्या परिसरात कोसळले होते त्या सुद्धा परिसरात जाऊन भेट दिली. पाहणी केल्यानंतर सदर अवशेष तपासणीसाठी इस्रो संस्थानाकडे पाठविण्यात येणार आहेत. सदरील पथकासोबत सिंदेवाही मधील तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन चे अधिकारी उपस्थित होते.




