Vidarbh24News

Latest Online Breaking News

उमेदच्या महिलांची तहसिल कार्यालयावर धडक

 

●रखडलेले मानधन त्वरित अदा करा

●उमेद -महिला कल्याणकारी मंडळाची मागणी

मारेगाव (6 एप्रिल):-  उमेद – महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या समुह संसाधन व्यक्तींचे मानधन थकीत आहे.गेल्या 12 महिन्यापासुन रखडलेले मानधन त्वरित अदा करा या प्रमुख मागणीसाठी उमेदच्या महिलांनी तहसील कार्यालयावर धडक देवून उमेद- कल्याणकारी मंडळ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत सर्व समूह संसाधन व्यक्ती कोविड – 19 च्या परस्तीती पासून अभियानाचे काम सातत्याने करीत आहे.कोविड -19 चा सर्वत्र प्रादुर्भाव असतांना देखील अभियानाच्या सर्व समूह संसाधन व्यक्तींनी ग्रामीण भागात केलेल्या मास निर्मिती कार्याची अवघ्या महाराष्ट्रात दखल घेण्यात आली.तसेच ग्रामीण भागातील कोविड लसीकरण मोहिमेत उमेद महिला समूह संसाधन व्यक्तींचे मोठया प्रमाणात सहभाग देवून शासनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला.गेल्या 12 महिन्या पासून मानधन रखडले असता तरी पण उमेदच्या कामात खंड पडू दिला नाही.करिता विविध मागण्यांसाठी उमेद च्या महिलांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ग्राम विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.यात उमेद समूह संसाधन व्यक्ती यांच्या मानधनात किमान 5 ते 7 हजार रुपये वाढ करण्यात यावी.गेल्या 12 महिन्या पासून समूह संसाधन व्यक्तीचे थकीत असलेले मानधन तत्काळ अदा करण्यात यावे.तसेच मानधन अग्रीम स्वरूपात ग्रामसभा/प्रभाग संघात कायमस्वरूपी ठेवण्यात यावे.अभियानामध्ये सी.एस. सी.अंतर्गत भरती न करता आमच्या समूह संसाधन व्यक्ती मधील शैक्षणिक गुणवत्ता अनुभवाच्या आधारे पात्र उमेदवारांणा संधी द्यावी.तसेच सर्व समूह संसाधन व्यक्तीचे कौटूंबिक आरोग्य विमा काढण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात यावे.तसेचआर.एफ/सी.आय.एफ/व्ही.आर.एफ व उपजीविका निधीत किमान 40% वाढ करून देण्यात यावे.तसेच ग्रामसंघ/प्रभागासाठी स्वतंत्र कार्यालय करिता सुसज्य इमारत/बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावे.आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.मागण्या मंजूर न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.यावेळी उमेद- महिला कल्याणकारी मंडळ तालुका शाखा मारेगाव च्या अध्यक्षा सौ.उज्वला चंदनखेडे, सचिव मंजुषा कोसरे,कोषाध्यक्ष कल्पना मनें, वर्षा खिरटकर,प्रियंका सिडाम,पचफुला टेकाम,रेखा जीवने, भारती सातपुते, संगीता डाखरे, पुष्पा भुसारी,प्रभाग कृषी व्यवस्थापक महेश पाचपोहर,प्रभाग पशु व्यवस्थापक प्रफुल शंभरकर सह आदी महिला उपस्थित होत्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!