वणी पोलीसांनी घोपटाळा तलावाचा मागील कोंबड बाजारावर मारली धाड…
●७ आरोपी ताब्यात व एकूण १ लाख ३४हजार ९९०/- रुपये मुद्देमाल जप्त.
वणी (3 एप्रिल) :– वणी पोलीस स्टेशन हद्दीतील भालर रोड घोपटाळा तलावाचे मागे झाडा- झुडुपात काही इसम कोंबडयाची झुंझ लावुन त्यावर पैसे लावुन काही व्यक्ती हारजीतीचा जुगार खेळत आहेत. त्या अनुशंगाने वणी पोलिसांनी कोंबड बाजारावर प्रतिबंधीत कारवाई करीत घटनास्थळावरून 7 आरोपिंना अटक करीत 1 लाख 34 हजार 990 रु मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक ०३/०४/२०२२ रोजी सपोनि माया चाटसे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून भालर रोड घोपटाळा तलावाचे मागे वणी झाडा-झुडुपात काही लोक सार्वजनिक ठिकाणी कोंबडा या पक्षाची झुंजीवर पैश्याची बाजी लावुन हार जितचा कोबड बाजार नावाचा जुगाराचा खेळ खेळवित आहे. अशा माहितीवरून सपोनि माया चाटसे यांनी व त्यांचा चमूसह धाड मारली असता,
त्यात संदीप दामोधर वनकर (वय ३५ वर्ष ) गणेशपुर, वणी २) स्वप्नील रामचंद्र बरडे (वय ३३ वर्ष) रामारी वस्ती ता. भद्रावती जि. चंद्रपुर 3) मंगेश महादेव जुनगरी (वय ३८ वर्ष) पेटुर ता. वणी जि.यवतमाळ ४) गणेश भालचंद्र आवारी (वय २४ वर्ष) रा. पिपळगाव वणी ५) उमेश किशोर झगझाप( वय २५ वर्ष) मोहूर्ली ६) विठ्ठल राउत (वय २५ वर्ष) रा जैनलेआउट, वणी ७) चरणदास मनोहर लेनगुळे( वय ४४) यांना अटक केली.
तसेच घटनास्थळावरून ०१ कोंबड नग ,लोखडी धारदार काली मित ६,३००/- रुपये वेगवेगळ्या कंपनीचे व मॉडलेच्या मोटार सायकल ०२ एकुण किमत ९०,०००/ रुपये व नमुद इसमांकडून एकुण नगदी ४,६९०/- रुपये एकण ०७ नग वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल ३४,०००/- रुपये असा एकुण १,३४,९९० /- रुपयाची मुद्देमाल मिळुन आला.
सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ व पो.नि महल्ले यांचे मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे ,कर्म पोहेको दिगांवर किनाके, पोना/ विठ्ठल बुरुजवाडे, सचिन मरकाम, संजय शेंद्रे पोकों / भानुदास हेपट, वसीम शेख, सागर सिडाम, गजानन गोडवे यांनी केली. पुढील तपास स पोना/ विठ्ठल बुरुजवाडे करीत आहे.




